शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

दोन्ही औद्योगिक वसाहतींचे पुढे काय

By admin | Updated: February 23, 2016 01:03 IST

प्रश्न हद्दवाढीचा : शासन व उद्योजकांतही संभ्रम

कोल्हापूर : कोल्हापूरच्या प्रस्तावित हद्दवाढीमध्ये शिरोली व गोकुळ शिरगांव यांचा समावेश जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या गावांच्या हद्दीतील दोन्ही औद्योगिक वसाहतींचे दैनंदिन व्यवस्थापन कोण पाहणार, यासंबंधीची संभ्रमावस्था उद्योजकांसह सर्वांच्याच मनात आहे. गावांसह या वसाहतीही महापालिकेत समाविष्ट होणार, या दोन वसाहतींसाठी स्वतंत्र टाऊनशीप होणार किंवा औद्योगिक महामंडळाकडूनच त्यांचे व्यवस्थापन केले जाणार, असे पर्याय उपलब्ध आहेत. शासन काय निर्णय घेणार यावर या वसाहतींचे भवितव्य ठरेल. शिरोली औद्योगिक वसाहतींत सुमारे साडेचार हजार तर गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतींत सुमारे अडीच हजार उद्योग आहेत. मूळची ही या दोन गावांची जागा आहे. ती औद्योगिकीकरणासाठी राज्य शासनाने एमआयडीसीमार्फत ताब्यात घेतली. त्यामुळे या जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर एमआयडीसीचा शिक्का आहे. रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सुविधांही महामंडळाच्यामार्फतच उद्योजकांना पुरविल्या आहेत, तरीही उद्योजक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून त्या-त्या ग्रामपंचायतींना फाळा म्हणून कर देतात. ग्रामपंचायतींना त्यातून आर्थिक उत्पन्न मिळते. औद्योगिक वसाहतींच्या बाहेरही या दोन्ही गावांत अनेकांनी छोटे-छोटे उद्योग सुरू केले आहेत. त्यांच्याही पुढे आता काय होणार, असा प्रश्न आहे. त्यातील काही उद्योजकांनी याबाबत ‘लोकमत’कडे विचारणा केली. त्यामुळे ‘लोकमत’ने संबंधित यंत्रणांकडे चौकशी केली असता त्यांच्या पातळीवरही कोणत्याच गोष्टीची स्पष्टता नसल्याचे दिसले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्याशी संपर्क साधला असता ते भेटू शकले नाहीत; परंतु महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार ग्रामपंचायतीच जर शहरात विलीन झाल्या तर औद्योगिक वसाहतींही शहरात समाविष्ट होऊ शकतील. त्याबाबत कोणता निर्णय होतो, यावर ते अवलंबून आहे. टाऊनशिपची मागणी पूर्वीचीच आहे; परंतु दहा वर्षांत एकही टाऊनशीप मंजूर नाही. यासाठी त्या-त्या ग्रामपंचायतींचा ‘ना हरकत दाखला’ हवा होता; परंतु त्या ग्रामपंचायतींचे अस्तित्व संपुष्टात येणार असेल, तर शासन टाऊनशिप मंजूर करू शकेल व त्यांच्या आधारे या वसाहतींचे व्यवस्थापन पाहू शकेल. सध्या तरी ‘वेट अँड वॉच..’ अशी स्थिती आहे.