शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

प्लास्टिकला पर्याय काय...बेकरी व्यवसायासमोर समस्या; पदार्थ खराब होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 12:27 IST

बेकरीतील बिस्कीट, खारी, बटर, टोस्ट या वस्तूंच्या पॅकिंगसाठी प्लास्टिक पिशवीचाच वापर केला जातो. त्यावर सध्या बेकरी व्यावसायिकांच्या काही उपाय समोर नसल्याने खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला राहणार नाही. त्यामुळे ग्राहकांवरही त्याचा परिणाम होण्याची भीती बेकरी व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देप्लास्टिक ला पर्याय काय...बेकरी व्यवसायासमोर समस्यापदार्थ खराब होण्याची भीती

कोल्हापूर : बेकरीतील बिस्कीट, खारी, बटर, टोस्ट या वस्तूंच्या पॅकिंगसाठी प्लास्टिक पिशवीचाच वापर केला जातो. त्यावर सध्या बेकरी व्यावसायिकांच्या काही उपाय समोर नसल्याने खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला राहणार नाही. त्यामुळे ग्राहकांवरही त्याचा परिणाम होण्याची भीती बेकरी व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.बेकरीतील प्रामुख्याने खारी, चिवडा, खाजे, पेढे या वस्तू पॅकिंगसाठी प्लास्टिक पिशवीचाच वापर केला जातो. एका ठिकाणाहून हा माल दुसऱ्या ठिकाणच्या बेकरीत पोहोचविण्यासाठी किंवा ग्राहकांना हे पदार्थ देण्यासाठी प्लास्टिकचे पॅकिंग उपयुक्त ठरत होते. मात्र, प्लास्टिकला बंदी आल्याने हा माल कसा पाठवयाचा, असा प्रश्न बेकरी विक्रेत्यांसमोर आला आहे.कागदातून पॅकिंग करून दिल्यास पदार्थ मऊ पडण्याची शक्यता आहे. प्लास्टिक पिशवीत बेकरी पदार्थ खूप दिवस टिकतात. पावसाळी व हिवाळी वातावरणात कागदी पिशवीतील पदार्थ भिजण्याची किंवा मऊ पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे पदार्थाच्या दर्जावर परिणाम होणार आहे, असल्याचे बेकरी व्यावसायिकांच्यामधून सांगण्यात येत आहेत. आमचा प्लास्टिक बंदीला विरोध नाही; मात्र यावर शासनानेच काहीतरी उपाय सुचवावा, अशी मागणी बेकरी व्यावसायिकांमधून होत आहे.

किराणा दुकानदारांना दिलासा...प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात काटेकोरपणे सुरू असताना किराणा दुकानांतील अडचणी लक्षात घेतल्या. पाव किलोवरील किराणा मालाच्या पॅकिंगसाठी असलेली प्लास्टिक बंदी शासनाने मागे घेतली आहे. या निर्णयामुळे किराणा व्यावसायिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक परत गोळा करण्याची जबाबदारीही संबंधित दुकानदारांचीच आहे.

पॅकिंगवर उत्पादकाचे नाव, पत्ता, प्लास्टिकचा दर्जा छापावा, उत्पादकांनी रिसायकलिंगसाठी कलेक्शन सेंटर्स उभारावीत. हे प्लास्टिक रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित दुकानदारांचीच राहणार असल्याने त्यांचे काम वाढले आहे.

पर्यावरणांच्या दृष्टिकोनातून प्लास्टिक बंदीचा निर्णय चांगला आहे. मात्र, बेकरी व्यवसायासाठी प्लास्टिकबाबत काही तरी पर्याय देणे गरजेचे आहे. बेकरी पदार्थ व प्लास्टिक यांचे अतूट नाते आहे. प्लास्टिक विना बेकरीतील पदार्थ ग्राहकांना किंवा अन्य दुकानांपर्यंत कसा पोहोचवायचा असा प्रश्न पडला आहे.एम. आर. शेख,अध्यक्ष,कोल्हापूर जिल्हा बेकर्स ग्राहक सहकारी मर्या संस्था 

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीkolhapurकोल्हापूर