शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दूध रोखायला मुंबई पाकिस्तानात आहे काय?, चंद्रकांत पाटील यांचा राजू शेट्टींना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 18:31 IST

‘दूधपुरवठा रोखायला मुंबई पाकिस्तानात आहे काय?’ असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांना केला. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

ठळक मुद्देदूध रोखायला मुंबई पाकिस्तानात आहे काय?चंद्रकांत पाटील यांचा राजू शेट्टींना सवाल कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई

कोल्हापूर : ‘दूधपुरवठा रोखायला मुंबई पाकिस्तानात आहे काय?’ असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांना केला. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.पन्हाळागड ते पावनखिंड मोहिमेचा प्रारंभ शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारने गाईच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान द्यावे, या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांनी १६ जुलैपासून ‘दूध संकलन बंद’ आंदोलन पुकारले आहे.

मुंबईकडे दूधवाहतूक करणाऱ्या सर्व मार्गांची नाकेबंदी करण्याची घोषणा शेट्टी यांनी केली आहे. याबाबत मंत्री पाटील यांना विचारले असता, मुंबईचे दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे काय? दूध रोखणे, भाजीपाला फेकणे ही शेतकरी आंदोलनाची पद्धत नाही.

शेतकऱ्याच्या घरातील दूध, भाजीपाला रस्त्यांवर फेकण्यापेक्षा स्वत:च्या घरातील दूध, भाजीपाला फेकावा, असा सल्ला देत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार असला तरी त्यातून सामान्य माणसाला त्रास होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. कोणी कायदा हातात घेणार असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नागपूर अधिवेशनाची मुदत वाढविण्याबाबत विधिमंडळ कामकाज समिती पुढील आठवड्यात निर्णय घेईल. नागपुरात जादा पाऊस पडल्याने विधिमंडळ अधिवेशनात व्यत्यय आला. नालेसफाईच्या चौकशीचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला असला तरी लोकशाही मार्गाने अशी मागणी करणे रास्त असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर