शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

पैसे मागणाऱ्यांची नैतिकता काय?

By admin | Updated: April 29, 2015 01:03 IST

संजय पाटील : महालक्ष्मी विकास आघाडीच्या प्रचारसभेत विचारणा; प्रचारफलकाचे उद्घाटन

कोल्हापूर : पॅनेलमध्ये उमेदवारी देण्यासाठी थेट पैसे मागणाऱ्या सुकाणू समिती व कारभारी मंडळींना मते मागण्याची नैतिकता नाही. जे सत्तारूढ म्हणत आहेत, त्यांना सहा तालुक्यांत उमेदवार मिळाले नाहीत, अशांना बाजूला करा, असे आवाहन सेवा मिनिट्रियलमधील उमेदवार संजय पाटील यांनी केले. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी निवडणुकीसाठी महालक्ष्मी विकास आघाडीच्या प्रचारार्थ हातकणंगले, शिरोळ, कागल व पन्हाळा तालुक्यातील प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साताप्पा मोहिते होते. हुकूमशाही प्रवृत्तीने कारभार करताना प्रत्येक वेळेला सभासदांचा अपमान करणाऱ्यांनी स्वाभिमानाची भाषा करू नये, असा टोला हाणत साताप्पा मोहिते म्हणाले, सर्व समावेशक चेहरे घेऊन आम्ही सभासदांसमोर गेलो आहे, प्रत्येक गोष्टीत मुस्कटदाबी करणाऱ्या कारभाऱ्यांचा खरा चेहरा समोर आल्याने विरोधकांचा तोल सुटला आहे. शपथ ही निष्ठावान माणसे सभासदांसमोर जाहीर सभेत घेतात, आजवर सभासद हिताची कोणती शपथ घेतली ते स्वयंघोषित कारभारी मंडळींनी जाहीर करावी, यासाठी एका व्यासपीठावर यावे. आर. बी. पाटील म्हणाले, उमेदवारी देताना सुकाणू समितीने स्वयंघोषित नेत्यांशी चर्चा केली पण सामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही. बिनविरोध निवडणूकच करायची असेल तर अंतिम क्षणाला अर्ज माघारी का दिले, याचा खुलासा करावा. जर चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना स्वत: बिनविरोध असेल तर इतर संघटनांचे उमेदवार बिनविरोध का करता आले नाहीत, याचे आत्मचिंतन नेत्यांनी करावे. आरोग्य संघटनेचे विभागीय सचिव मेहबूब शेख म्हणाले, निवडणूक बिनविरोधच करायची होती, तर सर्व सभासदांना बोलावून तसा प्रस्ताव का ठेवला नाही, केवळ आपल्याच काखेतील माणसांना बिनविरोधाचा प्रयत्न होता, अशा प्रवृत्तीला सभासद जागा दाखवतील. शिक्षक नेते एस. व्ही. पाटील म्हणाले, सामान्य सभासदाने प्रतिनिधीत्व करण्यासाठी संधी मागितली तर त्याची मुस्कटदाबी करायची ही सत्ताधाऱ्यांची जुनी पद्धत आहे. प्रत्येकाला स्वत:चे आचार-विचार मांडण्याचा अधिकार आहे. या हक्कांवर कोणी गंडांतर आणत असेल तर त्यांना बाजूला करण्याची क्षमता सभासदांमध्ये आहे. सुभाष इंदुलकर, प्रसाद पाटील, लक्ष्मी पाटील, दीपक साठे, सचिन जाधव, मनिषा सूर्यवंशी, संध्या कांदणे, अर्चना खाडे, राहुल रेपे, भिवाजी काटकर, पांडुरंग बर्गे यांनी मनोगत व्यक्त केले. महेश देवमोरे, अभिजित बंडगर, संजीव माने, सुबराव पवार, बी. के. मंगल, ए. जी. पाटील, अशोक मुसळे, दिलीप काळे, सुधीर कुंभार, प्राची बोटे, संगीता गुरव, मंगल पाटील, प्रतिमा पाटील, सुरेखा खटावकर, डॉ. सुनील काटकर, रघुनाथ खोत उपस्थित होते.