शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

असंघटित क्षेत्रातील ४ कोटी कामगारांचे वर्षभरात कल्याण - कामगार मंत्री हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 16:31 IST

किती नेते आणले, फुगा फुगवला, हवा केली तरी १६ तारखेला हा फुगा फुटणारच आहे आणि कोल्हापूरची जनताच तो फोडेल असा विश्वास आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर : असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यातील चार कोटी लोकांच्या सामाजिक सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने आपल्या खांद्यावर घेतली आहे. बांधकाम कामगारांच्या धर्तीवर इतर कामगारांचे महामंडळाच्या माध्यमातून कल्याण वर्षभरात करणार असल्याची ग्वाही ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कामगार कष्टकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयश्री जाधव यांना ५० हजारांच्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले.

कोल्हापूर उत्तरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ केशवराव भोसले नाट्यगृहात घरेलू कामगार, रिक्षाचालक, कामगार यांच्या संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळ कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, दिलीप पवार, आर.के.पोवार, गुलाबराव घोरपडे, संजय पवार व विजय देवणे, रमेश बागवे, सुशीला यादव, रिक्षा संघटनेचे राजू जाधव, सुभाष शेट्ये, सतीशचंद्र कांबळे उपस्थित होते.चंद्रकांत जाधव यांनी केलेली कामे, सर्वसामान्यांचे मिळवलेले आशीर्वाद या बळावर जयश्री जाधव याच बहुमताने निवडून येणार असा विश्वास व्यक्त करून मुश्रीफ यांनी कामगार मंत्री या नात्याने सर्व कामगारांचे कल्याण करण्याचे आपले धोरण आहे. घरेलू मोलकरीण, ड्रायव्हर, शेतमजूर यांना कल्याणकारी मंडळाच्या कक्षेत सामावून घेतले जाणार आहे. वर्षभरातच ही सर्व कामे मार्गी लावली जातील असे सांगितले.

उमेदवार जयश्री जाधव यांनी आण्णांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला साथ द्या, मी बिचारी नाही, खंबीर आहे, तुम्ही साथ दिली तर मी सेवेत कोणतीही कसर ठेवणार नाही असे भावनिक आवाहन केले. दिलीप पवार यांनी पहिली महिला आमदार निवडून देऊन इतिहास घडविण्याची संधी आली आहे, ती दवडू नका असे आवाहन केले.भाजपचा फुगा जनताच फोडेल: राेहित पाटील

कोल्हापुरात होऊ घातलेले ज्योतिषी खूप असलेतरी शिव, शाहूंच्या या भूमीत जयश्री जाधव यांचा विजयरथ कोणी रोखू शकणार नाही. किती नेते आणले, फुगा फुगवला, हवा केली तरी १६ तारखेला हा फुगा फुटणारच आहे आणि कोल्हापूरची जनताच तो फोडेल असा विश्वास आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी व्यक्त केला.निष्ठावंत शिवसैनिकांना मातोश्रीचा आदेेश अंतिम

निष्ठावंत शिवसैनिकांना मातोश्रीचा आदेश हाच अंतिम असतो. उद्धव ठाकरे यांनी तो आदेश दिला आहे, त्यांचे पालन निष्ठावंत शिवसैनिक करणारच आहेत, भाजप जाणीवपूर्वक संभ्रमावस्था निर्माण करत आहे. जयश्री जाधव यांना निवडून आणण्याची जबाबदारी सच्चा शिवसैनिकांची राहील अशी ग्वाही शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली.चंद्रकांत पाटील यांना हिमालयात पाठवूया

मेळाव्यात आलेल्या प्रत्येकाने एक एक रुपया जमा करावा, या पैशातून गाडी करून चंद्रकांत पाटील यांना हिमालयात पाठवून देऊयात अशी खोचक टिप्पणी शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ