शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

राजेश क्षीरसागर यांचे जल्लोषात स्वागत, फटाक्यांची आतषबाजी, मोटारसायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:26 IST

राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षपदावर निवडीनंतर आमदार राजेश क्षीरसागर यांचे गुरुवारी शिवसैनिकांनी कोल्हापुरात जल्लोषी वातावरणात स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांच्या गजरात शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देफटाक्यांची आतषबाजी : ढोलताशांचा गजर : मोटारसायकल रॅलीराज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्ष निवडीनंतर प्रथमच आगमन

कोल्हापूर : राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षपदावर निवडीनंतर आमदार राजेश क्षीरसागर यांचे गुरुवारी शिवसैनिकांनी कोल्हापुरात जल्लोषी वातावरणात स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांच्या गजरात शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.दुपारी बाराच्या सुमारास आमदार क्षीरसागर यांचे छत्रपती ताराराणी चौक येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने औक्षण करण्यात आले. यानंतर आमदार क्षीरसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापौर सरिता मोरे, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, नगरसेवक नियाज खान, नगरसेवक राहुल चव्हाण, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, आदींनी आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी शिवसैनिकांनी क्षीरसागर यांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर ढोलताशांच्या गजरात मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली. उघड्या जीपवर आमदार क्षीरसागर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी होते. ही रॅली दाभोळकर कॉर्नर, रेल्वे स्टेशन, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, सीपीआर चौक, छत्रपती शिवाजी चौक, पापाची तिकटीमार्गे शिवसेना शहर कार्यालय अशी काढण्यात आली. दरम्यान, क्षीरसागर यांनी रॅलीमार्गावरील छत्रपती राजाराम महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रॅलीमार्गावर ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.यावेळी किशोर घाटगे, अमर समर्थ, सुनील जाधव, महेश उत्तुरे, जयवंत हारुगले, प्रकाश सरनाईक, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, रणजित जाधव, सुनील खोत, अजित राडे, किशोर घाटगे, मंगल साळोखे, पूजा भोर, आदी उपस्थित होते.

क्षीरसागर यांनी घेतले अंबाबाईचे दर्शनदरम्यान, रॅलीनंतर आमदार क्षीरसागर यांनी सहकुटुंब करवीरनिवासिनी अंबाबाई आणि तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, स्नुषा दिशा क्षीरसागर उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Rajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरkolhapurकोल्हापूर