शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
5
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
6
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
7
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
8
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
9
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
10
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
11
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
12
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
13
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
14
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
15
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
16
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
17
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
18
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
19
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
20
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

Ganesh Chaturthi 2018 : पारंपरिक वाद्यांच्या गजरात कोल्हापूरात गणरायाचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 15:28 IST

ढोल- ताशासारख्या पारंपारिक वाद्यांचा गजर, लेझिम, झांजपथकांचा निनाद, दुसरीकडे बँड, बेंजो आणि सनईचे सूर, ‘गणपती बाप्पा मोरया,’ ‘गणेश गणेश मोरया’चा गजर, नऊवारी साड्यांचा मराठमोळा श्रृंगार ल्यालेल्या महिला, मुली; पारंपरिक वेशातील पुरुष मंडळी, घरोघरी पंचपक्वान्नांचा दरवळ, खीर-मोदकांच्या प्रसादाचा थाट अशा थाटात गुरुवारी श्री गणरायाचे आगमन झाले.

ठळक मुद्देपारंपरिक वाद्यांच्या गजरात कोल्हापूरात गणरायाचे जल्लोषात स्वागतप्रतिष्ठापना करण्यात मुली, महिलांचा फेटे घालून सहभाग

कोल्हापूर : ढोल- ताशासारख्या पारंपारिक वाद्यांचा गजर, लेझिम, झांजपथकांचा निनाद, दुसरीकडे बँड, बेंजो आणि सनईचे सूर, ‘गणपती बाप्पा मोरया,’ ‘गणेश गणेश मोरया’चा गजर, नऊवारी साड्यांचा मराठमोळा श्रृंगार ल्यालेल्या महिला, मुली; पारंपरिक वेशातील पुरुष मंडळी, घरोघरी पंचपक्वान्नांचा दरवळ, खीर-मोदकांच्या प्रसादाचा थाट अशा थाटात गुरुवारी श्री गणरायाचे आगमन झाले.गणपतीची स्तुती करणाऱ्या गीतांनी सकाळ सुरू झाली. दारात इंद्रधनुषी रंगांनी सजलेल्या रांगोळीचा गालिचा, घरादाराची साफसफाई झाल्यानंतर महिला श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी गव्हाची खीर, मोदकासह पंचपक्वान्नांचा नैवेद्य करण्यात गुंतल्या. बालचमू पारंपरिक वेशात सजून घरातील पुरुषांना व मोठ्यांना गणपतीच्या सजावटीसाठी मदत करीत होते.

वृद्ध माणसे प्रत्येक कामात सहकार्य करीत होती. एकीकडे घराघरांत ही लगबग सुरू असताना दुसरीकडे आपला देव घरी आणण्यासाठी आलेल्या भाविकांनी कोल्हापुरातील कुंभारवाडे गर्दीने फुलून गेले होते. फक्त शहरातीलच नव्हे तर कंदलगाव, पाचगाव, सरनोबतवाडी, नागदेववाडी अशा आसपासच्या गावांतूनही अनेक नागरिक कुंभारवाड्यांतून गणेश मूर्ती नेत होते.लहान मुले, मुली, वयस्कर माणसे, महिला अशा कुटुंबासह आलेले भाविक फटाक्यांची आतषबाजी, बॅँड-बाजा, ढोल-ताशा पथक, सनईच्या सुरावटीच्या साथीने आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करीत श्री गणेशाची मूर्ती नेत होते. यानिमित्त पापाची तिकटी, कुंभार गल्ली येथे जाणारे महाद्वार रोड, गंगावेश, महापालिका आणि शिवाजी चौक हे रस्ते अन्य वाहनांसाठी बंद करण्यात आले होते.

पायी चालत श्री गणेशाला घरी नेतानाच अनेकांनी फुलांच्या माळांनी सजविलेली हातगाडी, रिक्षा, चारचाकी अशा वाहनांतून बाप्पांची स्वारी घरी आणली. फटाक्यांची आतषबाजी झाल्यानंतर दारात उभारलेल्या सुवासिनींनी श्री गणरायाची दृष्ट काढत त्याचे औक्षण केले. रात्र-रात्र जागून खास बाप्पांसाठी तयार केलेल्या आराशीमध्ये बाप्पांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली.

पाच फळांची मांडणी, सुवासिक धूप-दीपाचा दरवळ, आरतीचे ताट, समईचा मंद प्रकाश, अभिषेक, प्रसाद, समोर पक्वान्नांचा नैवेद्य अशा थाटामाटात श्री गणेशाची पहिली आरती करण्यात आली. त्यानंतर कुटुंबीयांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. दुपारनंतर गणेश मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात झाली.

प्रतिष्ठापना करण्यात मुली, महिलांचा फेटे घालून सहभागमुला-मुलींमधील भेदभाव न बाळगणाºया या राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरातील भूमीत महिला आणि मुलीही गणेशमूर्ती घरी नेण्यात आणि त्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात मागे नव्हत्या. पापाची तिकटी, शाहूपुरी, बापट कॅम्प या सगळ्या कुंभार गल्लीमध्ये सजून आलेल्या महिला मुली श्री गणेशाची मूर्ती नेत होत्या. त्यांच्याच हस्ते मूर्तींची प्राणप्रतिष्ठापनाही केली जात होती.गजर पारंपरिक वाद्यांचाचदरवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस प्रशासनाने मोठ्या आवाजातील ध्वनी यंत्रणेऐवजी पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे, त्यानुसार श्री गणेशाच्या आगमनादिवशी पारंपरिक वाद्यांचाच गजर झाला. घरगुती गणेशासोबतच अनेक मंडळांनी बँड-बेंजो पथक, ढोल-ताशा, धनगरी ढोल अशा वाद्यांच्याच निनादात गणेशमूर्तींची मिरवणूक काढली.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८kolhapurकोल्हापूर