शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसोहळ्याचे चांदीचे दागिने आचारसंहितेच्या कचाट्यात; हुपरीतील ६ हजार व्यावसायिक त्रस्त

By पोपट केशव पवार | Updated: March 22, 2024 13:15 IST

बिल दाखवूनही जप्त करतात माल

पोपट पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: चांदीच्या कलाकुसरीमुळे देशभर प्रसिद्ध असलेला हुपरी परिसरातील चांदी व्यवसाय ऐन लग्न सराईच्या काळातच आचारसंहितेमुळे अडचणीत आला आहे. हुपरी परिसरातून पाठविले जाणारे चांदीचे दागिने, त्यातून मिळणारे पैसे देशभरातील चेकपोस्टवर जप्त केले जात असल्याने सहा हजार उद्योजकांना बनवलेल्या चांदीचे करायचे काय, असा प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे, बनवलेला माल परराज्यात पाठवणेच बंद केल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या४० हजार कामगारांच्या रोजीरोटीचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

हुपरी (ता. हातकणंगले) या परिसरात चांदी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. चांदीचा व्यवसाय करणारे सहा हजार उद्योग या परिसरात आहेत. 

रोज तीन टन पैंजण

हुपरी परिसरात चांदीचे तीन टन पैंजण रोज बनविले जातात. हा माल देशभर पाठवला जातो. सध्या लग्नसराई सुरू आहे. पैंजणला सर्वाधिक मागणी आहे. मात्र, याच काळात आचारसंहिता सुरू असल्याने माल पाठवण्यास उद्योजक घाबरत आहेत. मागणी असूनही माल पाठवता येत नसल्याने उद्योजकांचे मोठे नुकसान होत आहे.  

चेक पोस्टवर बिल दाखवूनही कारवाई

येथील सर्व माल बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थानसह देशभरात पाठवला जातो. परप्रांतात चांदीचे दागिने पुरवठा करण्यासाठी जाणाऱ्या उद्योजकांकडे जातेवेळी तयार दागिने असतात, तर येतेवेळी चोख चांदी, कच्ची चांदी, चांदीची मोड तसेच काही रक्कम असते. आचारसंहितेमुळे प्रत्येक चेकपोस्टवर तपासणी होते. खरेदी - विक्री केल्याचे बिल असूनही चेकपोस्टवर चांदी व्यावसायिकांचा माल व पैसे जप्त केले जात आहेत.

हुपरीतून देशभरात चांदीचा माल पाठवला जातो. आचारसंहिता काळात या मालाची वाहतूक करताना उद्योजकांनी नेमकी कोणती कागदपत्रे सोबत ठेवावीत, याबाबत प्रशासनाने आम्हाला सांगावे.-मोहन खोत, अध्यक्ष, चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन, हुपरी

चांदी व्यवसाय दृष्टिक्षेपात उद्योग - ६,०००कामगार - ४०,०००

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४