शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

फरार प्रियकरास शोधून लावली लग्नगाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 13:45 IST

लग्नाची फूस लावून तरुणीला कोल्हापुरात सोडून गेलेल्या प्रियकराला शोधून एकटी संस्था व पोलिसांनी त्यांचे लग्न लावून दिले. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तिचे कन्यादान केले.

ठळक मुद्देफरार प्रियकरास शोधून लावली लग्नगाठएकटी संस्था, शाहूपुरी पोलिसांचा पुढाकार

कोल्हापूर : लग्नाची फूस लावून तरुणीला कोल्हापुरात सोडून गेलेल्या प्रियकराला शोधून एकटी संस्था व पोलिसांनी त्यांचे लग्न लावून दिले. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तिचे कन्यादान केले.एकटी संस्थेच्या कार्यकर्त्यांना सहा महिन्यांपूर्वी कविता (नाव बदलले) शहरात फिरताना दिसली. चौकशी केल्यानंतर लक्षात आले की दिल्लीतील युवकाने तिला फूस लावून कोल्हापुरात आणले आणि ती गरोदर असताना तिला इथेच सोडून तो फरार झाला. अखेर ती एकटी संस्थेत आली. या अवस्थेत बाळ नको असल्याने तीने बाळाला गर्भातच मारण्याचा प्रयत्न केला.

संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या साह्याने तिचे समुपदेशन केले. आपली फसवणूक झाली आहे. जन्माला येणाऱ्या बाळाचे भवितव्य काय या प्रश्नामुळे ती मानसिक त्रासात होती. शाहूपुरी पोलिसांनी तिच्या प्रियकराचा शोध सुरू केला. संस्थेतीलच दुसऱ्या पीडित महिलेला सोशल मीडियावरून कविताच्या प्रियकराचा संपर्क झाला. पोलिसी खाक्या दाखविताच प्रियकराने आपली चूक कबूल केली व तिच्यासोबत लग्न करण्याची तयारी दर्शविली.

पोलीस ठाण्यातच त्याने कविता व तिने जन्म दिलेल्या ‘सृष्टी’ या बाळाचा स्वीकार केला. पोलिसांनी रामाच्या दिल्लीतील कुटुंबीयांना बोलावून घेतले व संस्थेच्या कार्यालयात त्यांचा विवाह करून देण्यात आला.पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी कविताचे कन्यादान केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, उपाध्यक्ष संजय पाटील, विश्वस्त उज्ज्वल नागेशकर, डॉ. मंजुळा पिशवीकर, शैला पाटील, शैला आडूरकर, पुष्पा कांबळे, पुष्पा पठारे, माधुरी डिगे, शोभा पोवार उपस्थित होेत्या.

 

 

टॅग्स :marriageलग्नkolhapurकोल्हापूर