शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सर्व दुकाने सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करू : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 17:44 IST

CoronaVirus In Kolhapur : कोल्हापूरचा कोरोना पॉझिव्हिटीचा रेट कमी होत आहे. सर्व दुकाने सुरू करण्याबाबत सोलापूर शहराप्रमाणे कोल्हापूर हे स्वतंत्र युनिट करता येईल का? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मंगळवारी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. आजपर्यंत तुम्ही संयमाने सहकार्य केले आहात, आणखी एक दिवस वेळ द्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाणी बिल, फायरसेसबाबत दिलासा देऊ, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी सांगितले.

ठळक मुद्देकोल्हापूर शहर स्वतंत्र युनिट करण्यासाठी प्रयत्न : पालकमंत्री सतेज पाटील पाणी बिल, फायरसेसबाबत दिलासा देऊ

कोल्हापूर : कोल्हापूरचा कोरोना पॉझिव्हिटीचा रेट कमी होत आहे. सर्व दुकाने सुरू करण्याबाबत सोलापूर शहराप्रमाणे कोल्हापूर हे स्वतंत्र युनिट करता येईल का? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मंगळवारी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. आजपर्यंत तुम्ही संयमाने सहकार्य केले आहात, आणखी एक दिवस वेळ द्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाणी बिल, फायरसेसबाबत दिलासा देऊ, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी सांगितले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंधांमुळे कोल्हापुरातील व्यापार, व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी, व्यावसायिकांकडून सातत्याने होत आहे. त्याबाबत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या उद्योगपती माधवराव बुधले सभागृहातील या बैठकीला खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते. कोरोनाबाबतच्या तपासणीचे रोजचे प्रमाण १५ हजारांपर्यंत आहे. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट साडेनऊ टक्क्यांपर्यंत आहे. दोन-तीन दिवसात तो ७-८ टक्क्यांपर्यंत येईल, असे दिसते. त्यामुळे कोल्हापूर शहर स्वतंत्र युनिट करून सर्व दुकाने सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत मंगळवारी चर्चा करणार आहे.

लॉकडाऊनमुळे व्यापार, व्यवसायाचे चक्र मंदावले आहे. त्यामुळे पाणी बिल, फायरसेसमधील वाढ कमी करून दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. घरफाळ्यामध्ये सवलत दिली तर त्याचा भार राज्य शासनाने उचलावा, याबाबतही विचार सुरू आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर अर्थचक्रातील विविध घटकांना पॅॅकेजच्या माध्यमातून न्याय देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न राहणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने सुरू करण्याबाबत काही विशेष बाब करता येईल का? याबाबत पालकमंत्री पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. व्यापार, व्यवसाय, उद्योगाला नवसंजीवनी देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले.

सर्व दुकाने उघडण्याबाबत पालकमंत्री पाटील यांच्या पाठपुराव्यातून निश्चितपणे सकारात्मक निर्णय होईल. व्यापारी, व्यावसायिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. पाणी बिलात दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आमदार चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.

या बैठकीत आनंद माने यांनी हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. पाणी बिल, फायरसेस, परवाना शुल्क कमी करावे, अशी मागणी केली. अर्थचक्राची सद्यस्थिती लक्षात घेऊन सरसकट दुकाने सुरू करण्याची मुभा देण्याची मागणी प्रदीपभाई कापडिया यांनी केली.

यावेळी संजय पाटील, शिवाजीराव पोवार, जयेश ओसवाल, उज्ज्वल नागेशकर, मोहनभाई पटेल, शांताराम सुर्वे, अरूण सावंत, प्रवीण शहा, आदी उपस्थित होते. कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी प्रास्ताविक केले. सचिव धनंजय दुग्गे यांनी आभार मानले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलSanjay Mandalikसंजय मंडलिकkolhapurकोल्हापूर