शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २० विरंगुळा केंद्रे उभी करू

By admin | Updated: January 24, 2015 00:07 IST

चंद्रकांत पाटील : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन

कोल्हापूर : ज्येष्ठ नागरिकांविषयी असणारी तळमळ आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनाप्रमुखांच्या नावे विरंगुळा केंद्राच्या उभारणीद्वारे दाखवून दिली आहे. आगामी काळात जिल्ह्यात अशाच प्रकारची २० ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे उभी करू, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. टाऊन हॉल येथे शुक्रवारी सकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पाटील म्हणाले, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी समन्वयाद्वारे एकमेकांप्रती आदर राखावा, बदलत्या काळानुसार आपली मानसिकता बदलावी आणि सुखी, खुशाल जीवन व्यतीत करावे. शिवसेनाप्रमुखांचे विचार सध्याच्या युवापिढीसह सर्वांनीच आचरणात आणावेत. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राप्रमाणेच जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराना एका ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे योजले आहे. त्यानुसार जिल्ह्यात वीस केंद्रे स्थापन केली जातील.आमदार क्षीरसागर म्हणाले, शिवसेनाप्रमुखांच्या नावे ज्येष्ठ नागरिकांकरिता विरंगुळा केंद्र उभे केल्याचा आपणास अभिमान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक संघटना विविध लोकप्रतिनिधींकडे आपल्या समस्या मांडत होते; परंतु त्यांना न्याय मिळत नव्हता. गेल्यावर्षी त्यांनी माझी भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. त्यानुसार पहिला टप्पा म्हणून या विरंगुळा केंद्राची स्थापना केली आहे. यापुढेही अशाच प्रकारचे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण केले जाईल. जिल्हाधिकारी राजाराम माने म्हणाले, समाजाची उत्क्रांती होत असताना माणसांचे आयुष्यमान वाढत असून, ज्येष्ठ नागरिकांनी वयोवृद्ध बनून न राहता आमदार क्षीरसागर यांनी विरंगुळा केंद्राद्वारे दिलेल्या संधीचा फायदा घेत कृतिशील बनण्याचे आवाहन केले. यावेळी मानसिंगराव जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता ए. एस. उपळे, कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक, उपअभियंता डी. एम. उगीले, शाखा अभियंता डी. जी. कल्याणकर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रा. विजय कुलकर्णी, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, माजी उपमहापौर उदय पवार, माजी नगरसेवक नंदकुमार गजगेश्वर, अनिल पाटील, जयवंत हारूगले, रमेश खाडे, भगिनी मंचच्या अध्यक्षा वैशाली क्षीरसागर, महिला आघाडी संघटक पूजा भोर, ऋतुराज क्षीरसागर आदी उपस्थित होते. पद्माकर कापसे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)