शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी संबंधितांशी बोलून मनपरिवर्तन करू - पालकमंत्री हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 13:29 IST

कोल्हापूर : आमची सर्वांची अस्मिता असलेले कोल्हापूर हे शहर आहे. हे चोहोबाजूंनी विकसित होण्यासाठी केंद्र शासनाच्या योजना आणि निधीची ...

कोल्हापूर : आमची सर्वांची अस्मिता असलेले कोल्हापूर हे शहर आहे. हे चोहोबाजूंनी विकसित होण्यासाठी केंद्र शासनाच्या योजना आणि निधीची शहराला गरज आहे. परंतु केवळ लोकसंख्या कमी असल्यामुळे आपण त्यासाठी पात्र ठरत नाही. म्हणूनच शहराच्या विविध सेवांचा लाभ घेणाऱ्या, शहरात मिसळलेल्या मोजक्या गावांमध्येच हद्दवाढ करण्याचे नियोजन आहे. १८ गावांना आम्ही महापालिकेत घेणार नाही. या सर्व संबंधितांशी दिवाळीनंतर बोलू आणि त्यांचे मनपरिवर्तन करू, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.सीपीआरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, या सर्वांचे जे गैरसमज झाले आहेत ते दूर करावे लागतील. पुणे, ठाणे येथील विकास योजना पाहिल्यानंतर शेजारची गावे आम्हाला शहरात घ्या म्हणून मागे लागली आहेत. त्यामुळे या सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सीपीआरबाबत मुश्रीफ म्हणाले, मी या विभागाचा मंत्री म्हणून सूत्रे घेतल्यानंतर सीपीआरमध्ये कॅन्सर, होमिओपॅथी, संधीवात, थायरॉईड तपासणी, उपचार सेवा सुरू केली आहे. नांदेडच्या घटनेनंतर संपूर्ण आरोग्य यंत्रणेलाच मजबूत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. नांदेडला ५०० खाटांच्या रुग्णालयात हजार जण दाखल होत होते. मनुष्यबळ कमी आहे. म्हणूनच आता उच्च न्यायालयाने वर्ग १ आणि २ ची पदे भरण्याचे आदेश एमपीएससीला दिले आहेत. यातूनही जागा रिक्त राहिल्या तर कंत्राटी भरल्या जातील. डॉक्टरांना शासकीय सेवेत येण्यासाठी आकर्षित करण्यासाठी काय करावे लागेल यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. वर्ग ३ च्या जागांचे लेखी पेपर होऊन निकालही लागला आहे. ऑक्टोबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण होईल. वर्ग चारच्या जागा तातडीने भरण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सीपीआरमधील गैरप्रकारांबाबत चौकशी समिती स्थापन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अवयवदानाची चळवळ हाती घेणारशासकीय रुग्णालयातून लिव्हर आणि किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार असून यासाठी रिलायन्स फाउंडेशन सहकार्य करणार आहे. अवयवदानाचे फायदे सांगणारी चळवळच मला आता हाती घ्यावी लागणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ