शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

रस्ता आम्ही केला... पाव्हणं, आता या घराकडं ! कुंभोजला रस्ता लोकवर्गणीतून अतिक्रमणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:58 AM

कुंभोज : हॅलो.... पाव्हणं, आमच्याकडं यायला नीट रस्ता नसल्यानं तुम्ही यायचंच टाळलंय. आता आमचा रस्ता आम्ही केला. गाडी थेट घरापर्यंत येतेय.

ठळक मुद्देपाणंदीने तुटलेली शेतं आणि दुभंगलेली माणसंही पुन्हा जोडली

कुंभोज : हॅलो.... पाव्हणं, आमच्याकडं यायला नीट रस्ता नसल्यानं तुम्ही यायचंच टाळलंय. आता आमचा रस्ता आम्ही केला. गाडी थेट घरापर्यंत येतेय. आतातरी या आमच्याकडं... कुंभोज (ता. हातकणंगले) येथील भोकरे मळ्यातील शेतकरी आदिनाथ भोकरे यांनी मोबाईलवरून पाहुण्यांना केलेली ही विनवणी. अतिक्रमणामुळे गायब झालेला पाणंद रस्ता लोकवर्गणीतून अतिक्रमणमुक्त केल्यानंतर यापूर्वी पायवाटेलाही मुकलेल्या भोकरे कुटुंबाच्या प्रमुखांनी आनंदाप्रीत्यर्थ पैै-पाहुण्यांना बोलावून घेऊन नवीन रस्ता दाखविला. इतकेच नव्हे, तर या पाणंदीने तुटलेली शेतं आणि दुभंगलेली माणसंही पुन्हा जोडली. आपलाच रस्ता आपण करणाऱ्या शेतकºयांचे या निमित्ताने गावात मोठे कौतुकही होत आ.कुंभोज-दानोळी रस्त्यापासून दक्षिणेस डोंगर पायथ्यापर्यंत जाणारी सुमारे दोन कि. मी. अंतराची भोकरे पाणंद ३५-४० वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. तथापि, शेतकºयांनी केलेले अतिक्रमण, दोन्ही कडेने वाढलेली झाडवेली यामुळे पाणंद रस्ता पायवाटेपुरताही मोकळा राहिला नाही. परिणामी, उसासह अन्य शेतमालाची वाहतूक करणे शेतकºयांना कष्टाचे आणि खर्चिक होऊ लागले. रस्त्यासाठी एकमेकांकडून होणाºया अडवणुकीमुळे भोकरे कुटुंबीयांनी एक एकर शेती विकली, तर अनेकांनी ऊस पीक घेणे बंद केले. सतत चाळीस वर्षांपासूनच्या या समस्येवर वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, विनायक पोतदार यांनी शेतकºयांना बळ देऊन रस्ता बनविण्यासाठी प्रवृत्त केले.एकरी पाच हजार रुपये वर्गणी काढून सुमारे दोन लाख रुपये खर्चून पाणंद अतिक्रमणमुक्त करण्यात आली. आपल्या वाटेसाठी शेतकºयांनीच पदरमोड करून रस्त्याचा प्रश्न सोडविला. सुमारे दोन कि.मी. पाणंद वाहतुकीस खुली झाल्याने भोकरे मळ्यात वास्तव्यास असणारी चार कुटुंबे सुखावली.रस्ता करण्यासाठी पुढाकार घेणारे अनिल भोकरे, रामा खोत, चंदू स्वामी, राजू भगत, सागर खोत, संजय भोरे, प्रकाश भोसे, रतन कोळी, प्रियदर्शन पाटील-नरंदेकर यांच्यासोबत शंभराहून अधिक शेतकºयांची रस्त्याच्या निमित्ताने एकजूट झाली आणि पाणंदीच्या रुंदीकरणाला विरोध करणारे एकमेकांच्या नुकसानीस आजवर कारण ठरलेले या भागातील शेतकºयांची शेतं वाटेमुळे पुन्हा जोडली गेली आणि रस्त्यासाठी झालेल्या वादविवादातून एकमेकांपासून दुभंगलेले शेतकरी कित्येक वर्षांनंतर हातात हात घालून या पाणंदीतूनच ये-जा करू लागले आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग