शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही जमवाजमवीतील नव्हे, खासदार संजय मंडलिकांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 16:46 IST

म्हाकवे  :  कार्यकर्त्यांना नेहमीच संघर्ष करावा लागू नये, यासाठी आम्ही जुळवून घेत होतो. याचा अर्थ आम्ही जमवाजमवीतील आहोत असा ...

म्हाकवे  :  कार्यकर्त्यांना नेहमीच संघर्ष करावा लागू नये, यासाठी आम्ही जुळवून घेत होतो. याचा अर्थ आम्ही जमवाजमवीतील आहोत असा नाही. आम्ही दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांचा स्वाभीमानी विचार जोपासणारे आहोत.त्यामुळे स्वाभिमानाला धक्का लागल्यानंतर संघर्षालाही आपण कमी पडत नसल्याचे कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दाखवून दिले आहे. यापुढेही लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचा स्वाभिमानी विचार कायम जपू असा निर्धार खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.हमिदवाडा (ता.कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कारखाना प्रेरणास्थळावर लोकनेते मंडलिक यांच्या सातव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर होते.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सागर देशपांडे होते.स्व.मंडलिक यांचे स्वप्न असणारा इथेनॉल हा महत्वकांक्षी प्रकल्प येत्या चार दिवसात पुर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याचेही खासदार मंडलिक यांनी सांगितले. यावेळी बाबासाहेब पाटील-सरुडकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, प्रा.जीवन साळोखे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी विजयसिंह मोरे, सुरेशराव कुराडे महिला व बालकल्याण सभापती शिवानी भोसले, जि.प.सदस्य अर्जुन आबिटकर,उपाध्यक्ष बापुसाहेब भोसले, बंडोपंत चौगुले, एस आर बाईत,अतुल जोशी आदी उपस्थित होते.....तर पहिला राजीनामा मंडलिकांचामॉलमधून वाईन विक्रीचा निर्णय शेतकरी हिताचा असता तर मग यापूर्वीच हा निर्णय का घेतला नाही. असा सवाल उपस्थित करत स्व.मंडलिक यांनी रान उठविले असते. ते जरी मंत्रीमंडळात असते तरीही त्यांनी आपला राजीनामा देऊन या निर्णयाला विरोध केला असता. भावी पिढी बरबाद होवू नये. याची राजकीय जाण असणारे ते बुलंद नेतृत्व होते अशा आठवणी यावेळी सांगण्यात आल्या.

मंडलिकांची छबी.... मतदानाची हमीकागल, राधानगरी, भुदरगड, आजरा भागात जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचाराच्या वेळी भेटी देत होतो. यावेळी अनेकांच्या घरात स्व.मंडलिक यांचे फोटो पहायला मिळत. त्यावरून मतदानाची हमी मिळत होती. माझ्या उमेदवारीबाबत मंडलिकांनी बंड केले. त्यामुळेच आपण जिल्हा  बँकेत जावू शकलो, अशी कृतज्ञताही बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSanjay Mandalikसंजय मंडलिकPoliticsराजकारण