शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या वाहनांवर आम्हालाही बंदी घालावी लागेल, पालकमंत्री सतेज पाटील यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:42 IST

Satej Gyanadeo Patil Kolhapur-कोरोनाला प्रतिबंध करायचा म्हणून कर्नाटक सरकारने कोगनोळी नाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांवर बंदी घालणे योग्य नाही. अन्यथा आम्हालाही तेथील प्रवासी आणि वाहनांवर बंदी घालावी लागेल, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिला. या प्रश्नात केंद्राने हस्तक्षेप करण्याची मागणी करत त्यांनी कर्नाटकने जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलण्याऐवजी स्वत: नाक्यावर आरटीपीसीआर चाचणी केंद्र उभारावे, असे आवाहनही त्यांनी केले.

ठळक मुद्देकर्नाटकच्या वाहनांवर आम्हालाही बंदी घालावी लागेल, पालकमंत्री सतेज पाटील यांचा इशाराकोविड तपासणीची जबाबदारी कर्नाटकने घ्यावी

कोल्हापूर : कोरोनाला प्रतिबंध करायचा म्हणून कर्नाटक सरकारने कोगनोळी नाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांवर बंदी घालणे योग्य नाही. अन्यथा आम्हालाही तेथील प्रवासी आणि वाहनांवर बंदी घालावी लागेल, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिला. या प्रश्नात केंद्राने हस्तक्षेप करण्याची मागणी करत त्यांनी कर्नाटकने जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलण्याऐवजी स्वत: नाक्यावर आरटीपीसीआर चाचणी केंद्र उभारावे, असे आवाहनही त्यांनी केले.महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गेल्या चार दिवसांपासून कर्नाटक सरकारने कोगनोळी टोलनाक्यावर चेक पोस्ट उभारले आहे. येथे महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना अडवून प्रवाशांना कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याने प्रमाणपत्र मागितले जात आहे. प्रमाणपत्र नसलेल्या नागरिकांना राज्यात प्रवेश दिल जात नसल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ होत आहे.

या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील म्हणाले, लांब पल्ल्याचा प्रवास करून आलेल्या नागरिकांंवर बंदी घालणे योग्य नाही. लोक सीमेवर येऊन थांबत आहेत, त्यांची तारांबळ होत आहे. या प्रवाशांची कोल्हापुरात आरटीपीसीआर चाचणी केली जावी, असे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे; पण मुंबईत जगभरातील नागरिक येतात, त्यांची जबाबदारी मुंबई महापालिकेने घेतली.

प्रवाशांची चाचणी करून त्यांना क्वारंटाईन केले जाते. त्याचप्रमाणे कर्नाटकने आपली जबाबदारी महाराष्ट्रावर न ढकलता स्वत: आरटीपीसीआर चाचणी केंद्र उभारावे व नागरिकांना सात दिवस क्वारंटाईन करावे. सध्या आमचे कर्नाटक सरकारशी बोलणे सुरू आहे. काही तोडगा न निघाल्यास आम्हालाही तेथील वाहने व प्रवाशांवर बंदी घालावी लागेल. 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक