शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

व्हाट्सअॅप ग्रुपने साजरा केला हृदयस्पर्शी रक्षाबंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 21:52 IST

काही विशेष मुली राखी बांधत होत्या... काही विशेष मुलं राखी बांधून घेत होती...पण सर्वांच्या चेहऱ्यावर भाव होते आनंदाचे, समाधानाचे... आपले रक्षण करण्याचे वचन देण्यासाठी कोणीतरी पुढे आल्यामुळे या विशेष मुला-मुलींना झालेला आनंद खरोखरच अवर्णिय असा होता.

- संदीप आडनाईक

कोल्हापूर, दि. 8 - काही विशेष मुली राखी बांधत होत्या... काही विशेष मुलं राखी बांधून घेत होती...पण सर्वांच्या चेहऱ्यावर भाव होते आनंदाचे, समाधानाचे... आपले रक्षण करण्याचे वचन देण्यासाठी कोणीतरी पुढे आल्यामुळे या विशेष मुला-मुलींना झालेला आनंद खरोखरच अवर्णिय असा होता.निमित्त होते अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाईडतर्फे आयोजित इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित स्वयम् विशेष मुलांच्या शाळेतील रक्षाबंधन कार्यक्रमाचे. अनोख्या व हृदयस्पर्शी वातावरणात मंगळवारी हा सोहळा साजरा करण्यात आला. या विशेष मुलांनाही सण साजरे करण्याचा आनंद लुटता यावा यासाठी 'स्वयम्'च्या या अनोख्या रक्षाबंधन कार्यक्रमात अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाईड या व्हाटस्अॅप ग्रुपचे सदस्य मोठया उत्साहाने सहभागी झाले. विशेष म्हणजे, यावेळी ग्रुपच्या सदस्या स्मिता सावंत, नितीन राजशेखर व शेफाली मेहता यांनी तीन मुली दत्तक घेऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. तर, विशेष मुलांनी तयार केलेल्या निरनिराळ्या समाजोपयोगी वस्तु व गणेशमुर्ती खरेदी करून त्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन ग्रुपतर्फे करण्यात आले. यावेळी ग्रुपचे अॅडमीन अॅड. इंद्रजित चव्हाण, इंडियन रेडक्रॉस सोसायटी  व 'स्वयम' चे उपाध्यक्ष अमरदीप पाटील, संचालक शैलेश देशपांडे, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, स्मिता सावंत, 'मिसेस महाराष्ट्र' गौरी शिरोडकर, कविता घाटगे, नितीन राजशेखर, किरण शहा, श्रद्धा राणे, शेफाली मेहता इत्यादी सदस्य तसेच शाळेचे प्राचार्य व शिक्षक हजर होते.