नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी! कोल्हापुरात काही भागात बुधवारपासून एक दिवसआड पाणीपुरवठा

By भारत चव्हाण | Published: February 26, 2024 11:16 PM2024-02-26T23:16:26+5:302024-02-26T23:16:39+5:30

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेची पाईपलाईन चंबुखडी GSR ला जोडण्यासाठी क्रॉस कनेक्शन करण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे.

Water supply every other day from Wednesday in some areas in Kolhapur | नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी! कोल्हापुरात काही भागात बुधवारपासून एक दिवसआड पाणीपुरवठा

नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी! कोल्हापुरात काही भागात बुधवारपासून एक दिवसआड पाणीपुरवठा

भारत चव्हाण / लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेची पाईपलाईन चंबुखडी GSR ला जोडण्यासाठी क्रॉस कनेक्शन करण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे. तसेच धरणातील पाणीसाठा विचारात घेता व कळंबा तलावाची पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने तलावातील जलचरांना धोका निर्माण झालेला आहे. भविष्यात होणाऱ्या पाणीटंचाईचा विचार करता महापालिकेच्या वतीने बुधवारपासून एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केलेले आहे. 

 शहरातील ए, बी, ई वॉर्ड अंशत: व सी, डी वॉर्ड तसेच सलग्नीत उपनगरे व ग्रामिण भागातील बालिंगा योजनेवर अवलंबून असणा-या भागामध्ये बुधवारपासून (दि. २८) पासून  एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

बुधवारी आझाद गल्ली, मटण मार्केट, लक्ष्मीपुरी परिसर, शाहूपुरी ५, ६, ७, व ८ वी गल्ली, कामगार चाळ, सुभाषरोड, चांदणी चौक, रविवार पेठ, सुतार वाडा, खानविलकर पेट्रोल पंप, अकबर मोहल्ला, साळी गल्ली, महाराणा प्रताप चौक, शाहूपुरी कुंभार गल्ली, बाराइमाम परिसर, भवानी मंडप परिसर, सब जेल परिसर, मिरजकर तिकटी परिसर, महालक्ष्मी नगर, टेंभी रोड परिसर, सावित्रीबाई फुले दवाखाना परिसर या भागात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

तर गुरूवारी (दि.२९) महाद्वार रोड परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, ब्रम्हेश्वर बाग, तटाकडील तालीम परिसर, चंद्रेश्वर, संध्यामठ, फुलेवाडी, रंकाळा टॉवर, शिवाजी पेठ काही भाग, गुजरी परिसर, दत्त गल्ली, लक्ष्मी गल्ली, गंगावेश, दुधाळी, पंचगंगा रोड, लोणार चौक, पापाची तिकटी, बुरुड गल्ली, सोन्या मारुती चौक, शिपुगडे तालीम, पिवळा वाडा, डोरले कॉर्नर, सिद्धार्थनगर, ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर परिसर, लक्षतीर्थ, बलराम कॉलनी या भागात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

या भागातील नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आव्हान पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Water supply every other day from Wednesday in some areas in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी