शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शहरात तांत्रिक कारणांमुळे पाणी पुरवठा बंद, नागरीक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 14:38 IST

कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भोगावती नदीवरील बालिंगा व नागदेववाडी येथील उपसा केंद्राकडील ट्रान्स्फॉर्मर जळाल्यामुळे मंगळवारी दिवसभर शहरात पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला. धरणात सरासरीपेक्षा अधिक जलसाठा असताना, नदी काठोकाठ भरुन वाहत असताना केवळ तांत्रिक कारणांमुळे पाणी पुरवठा बंद पडल्यामुळे विशेषत: महिला वर्गाची बरीच गैरसोय झाली.

ठळक मुद्देशहरात तांत्रिक कारणांमुळे पाणी पुरवठा बंद, नागरीक हवालदिलबालिंगा व नागदेववाडीतील ट्रान्स्फॉर्मर जळाले

कोल्हापूर : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भोगावती नदीवरील बालिंगा व नागदेववाडी येथील उपसा केंद्राकडील ट्रान्स्फॉर्मर जळाल्यामुळे मंगळवारी दिवसभर शहरात पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला. धरणात सरासरीपेक्षा अधिक जलसाठा असताना, नदी काठोकाठ भरुन वाहत असताना केवळ तांत्रिक कारणांमुळे पाणी पुरवठा बंद पडल्यामुळे विशेषत: महिला वर्गाची बरीच गैरसोय झाली.गेल्या दोन दिवसापासून शहरातील काही विशिष्ट भागात अपूरा, कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी असतानाच सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक भोगावती नदीवर असलेल्या बालिंगा व नागदेववाडी येथील उपसा केंद्रातील ट्रान्स्फॉर्मर जळाले.

एकाच वेळी दोन ट्रान्स्फॉर्मर जळल्यामुळे बालिंगा जलशुध्दीकरण केंद्राचे काम बंद पडले. बालिंगा जलशुध्दीकण केंद्रातून चंबुखडी पाण्याची टाकी भरली की पहाटे दोन वाजल्यापासून शहराच्या चार वॉर्डांना पाणी पुरवठा सुरु केला जातो. परंतु रात्री साडेबारा वाजताच ट्रान्स्फॉर्मर जळल्यामुळे बालिंगा जलशुध्दीकरण केंद्र बंद पडले. परिणामी शहरातील पाणी पुरवठा बंद झाला.शहरातील ए, बी, सी व डी या भागासह उपनगरातील नागरीकांची त्यामुळे मोठी गैरसोय झाली. सानेगुरुजी वसाहतीपासून गंगावेश, शिवाजी पूल तसेच दुधाळीपासून उमा टॉकीजपर्यंतच्या सर्वच भागात पाणी मिळाले नाही.ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीचे काम पहाटे साडेपाच वाजल्यापासून हाती घेण्यात आले. परंतु हे काम सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु होते. दुपारी एक वाजता नागदेववाडी उपसा केंद्राचा एक पंप तर बालिंगा जलशुध्दीकरण केंद्राकडील एक उपसा पंप सुरु करण्यात पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना यश आले, परंतू मागणीपेक्षा पुरवठ्याचे प्रमाण अगदीच नगण्य होते. मंगळवारी दिवसभर शहरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवली. बुधवारीही कमी दाबाने तसेच अपूरा पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर