शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

विविध गडांवरील पाणी शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 4:18 PM

हिमालयाच्या लेह-लद्दाख प्रदेशातील २० हजार १९० फूटावर असणाऱ्या स्टोक कांगरी या पर्वतावरील व महाराष्ट्रातील भीमाशंकर,पदरगड, कोथळीगड, पन्हाळगड, रायगड या गडांवरील पाणी कोल्हापूर हायकर्स फौंडेशनतर्फे ५ जूनला रायगडावर आणण्यात येणार आहे. ६ जूनला या पाण्याने शिवराज्याभिषेक सोहळ्यात जलाभिषेक करण्यात येईल, अशी माहिती संस्थापक सागर पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देशिवराज्याभिषेक दिनी रायगडावरकोल्हापूर हायकर्स फौंडेशनचा उपक्रम : ३१ मे रोजी कार्यकर्ते रवाना होणार

कोल्हापूर : हिमालयाच्या लेह-लद्दाख प्रदेशातील २० हजार १९० फूटावर असणाऱ्या स्टोक कांगरी या पर्वतावरील व महाराष्ट्रातील भीमाशंकर,पदरगड, कोथळीगड, पन्हाळगड, रायगड या गडांवरील पाणी कोल्हापूर हायकर्स फौंडेशनतर्फे ५ जूनला रायगडावर आणण्यात येणार आहे. ६ जूनला या पाण्याने शिवराज्याभिषेक सोहळ्यात जलाभिषेक करण्यात येईल, अशी माहिती संस्थापक सागर पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा रायगडावर खासदार संभाजीराजे यांच्या पुढाकाराने भव्य दिव्य प्रमाणात साजरा होत आहे. प्रत्येक वर्षी कोल्हापूर हायकर्सनेही या सोहळ्यात सहभाग नोंदविला आहे.

ट्रेकच्या माध्यमातून विविध ठिकाणांहून पाणी आणून शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी जलाभिषेक केला जात आहे. यंदाही पहिल्या टप्प्यातील मोहिमेत मावळ्यांनी हिमालयाच्या लेह-लद्दाख प्रदेशातील २० हजार १९० फूटावर असणाºया स्टोक कांगरी या पर्वतावरील पाणी आणले आहे. तर दुसºया टप्प्यातील मोहिम ३१ मे रोजी सुरु होणार आहे.

महाराष्ट्रातील भीमाशंकर, पदरगड, कोथळीगड, पन्हाळगड, रायगड येथील पाणी घेऊन मावळे ५ जूनला रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ठिकाणी जाणार आहेत. या मोहिमेत सागर पाटील, शशांक तळप, राकेश सराटे, प्रणव बारटक्के, तेजन कुमठेकर, तन्मय हावळ, रवी धुमाळ, निरंजन रणदिवे, विजय ससे, मुकुंद हावळ, अतुल पाटील, संतोष घोरपडे हे गिर्यारोहक रवाना होणार आहेत. 

 

टॅग्स :Raigadरायगडkolhapurकोल्हापूरFortगड