शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिरावर ६० सीसीटीव्ही कॅमेरांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 11:51 IST

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन, देवस्थान समितीचे सुरक्षा रक्षक, स्वयंसेवकासोबतच अत्याधुनिक ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर मंदिर परिसरावर असणार आहे. दरम्यान, सोमवारी मंदिर परिसरात अत्याधुनिक अग्निरोधक यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिरावर ६० सीसीटीव्ही कॅमेरांचा वॉचअग्निरोधक यंत्रणेचे प्रात्यक्षिक : सुरक्षेत वाढ

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन, देवस्थान समितीचे सुरक्षा रक्षक, स्वयंसेवकासोबतच अत्याधुनिक ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर मंदिर परिसरावर असणार आहे. दरम्यान, सोमवारी मंदिर परिसरात अत्याधुनिक अग्निरोधक यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.येत्या रविवारपासून (दि. २९) नवरात्रौत्सव सुरू होत आहे. यानिमित्त अंबाबाई मंदिरात उत्सवाची लगबग सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कालावधीत भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेत, यंदाच्या वर्षी मंदिर सुरक्षेसाठी अधिक कुमक मागवावी लागणार आहे. या तयारीचाच एक भाग म्हणून सोमवारी दुपारी मंदिर परिसरातील उद्यानात अग्निरोधक यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अचानक आग लागली, तर ती विझवायची कशी, हे यावेळी दाखविण्यात आले.उत्सवकाळात मंदिर परिसरात चारही दरवाजाबाहेर पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. पूर्व दरवाजाबाहेर दोन व अन्य तीन ठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे पाच डीएफएमडी यंत्रणा म्हणजे मेटल डोअर डिटेक्टर असणार आहेत. गेटवरील प्रत्येक सुरक्षारक्षकाकडे हॅन्ड मेटल डिटेक्टर असणार आहेत.

बिनतारी संदेश यंत्रणेचे १५ संच कार्यान्वित असणार आहेत. याशिवाय शेतकरी संघ व राजवाडा पोलीस स्टेशन अशा दोन ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा कक्षाची उभारणी केली जाणार आहे. पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार मंदिर परिसरात व मंदिरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू आहे. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्ष देवस्थान समिती कार्यालयात असणार आहे. येथे समितीचे कर्मचारी दर्शनरांगेसह परिसरावर बारकाईने लक्ष देणार आहेत.

 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर