शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यातील खरीप हंगाम वाया

By admin | Updated: July 19, 2015 23:35 IST

शेतकरी हवालदिल : पावसाअभावी दुष्काळाची छाया गडद

भागवत काटकर-शेगाव -जत तालुक्यात पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम पूर्णत: वाया जाण्याच्या मार्गावर आहे. आता दुबार पेरण्याही होणे शक्य होणार नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाई, चाराटंचाई व पिकांचे नुकसान अशा तिहेरी संकटात जत तालुक्यातील शेतकरी सापडला आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास दुष्काळाची छाया गडद होणार आहे. जत तालुक्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांनी बाजरी, मका, मूग, भुईमूग, उडीद, तूर, सूर्यफुल आदी पिकांची लागवड केली आहे. एकूण तालुक्यात ६४ हजार हेक्टर क्षेत्र खरिपाचे असून, पैकी २४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या खरीप हंगामातील कडधान्यांच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना थोडेफार आर्थिक सहाय्य मिळते. मात्र पावसाच्या ओढीने व वाढते तापमान यामुळे पिकांची हानी होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यात टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसभर ढगाळ वातावरण व रात्री थंड हवा, अशा विचित्र हवामानामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने पशुधन कसे वाचवायचे, या चिंतेत पशुपालक शेतकरी आहेत. पावसाने ओढ दिल्याने ज्वारीचा कडबा शेकडा ८०० रूपयांवरून १८०० ते २००० रूपये झाला आहे. ज्वारीच्या एका पेंडीचा दर १८ ते २० रूपयांपर्यंत झाला आहे. जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालू आहे. शिवाय ऊस दर २५०० ते २८०० रुपये टनापर्यंत पोहोचला आहे. शेतीपूरक व्यवसायाला जोड म्हणून शेतकऱ्यांनी जनावरांची जोपासना मोठ्या प्रमाणात केली आहे. तालुक्यात एकूण जनावरांची संख्या ६ लाख १० हजार ६०५ इतकी आहे. जनावरे शेळ्या, मेंढ्या जगविण्यासाठी पाणी व चाराटंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत केंद्रीय कृ षिमंत्री राधामोहन सिंह यांनी कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना डिझेल, बियाणे व विजेसाठी अनुदान देऊ, असे जाहीर केले होते. बियाणांवर ५० टक्के अनुुदान व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज दिली जाईल, असेही जाहीर केले होते. त्याचा पाठपुरावा खा. संजय पाटील यांनी करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.