शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

कोल्हापुरात एकाच रस्त्यावर दोन विभागाच्या निधीची उधळण, बांधकाम विभागाचा अट्टाहास

By भारत चव्हाण | Updated: February 29, 2024 12:58 IST

निधी अन्य कामांवर वळविण्यात काय अडचण?

भारत चव्हाणकोल्हापूर : रस्ते करण्यास एकीकडे निधी मिळत नाही, अशी ओरड सुरू असताना दुसरीकडे मात्र शहरातील एकच रस्ता महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग असे दोघेही करणार आहेत. एकाच रस्त्यावर दोन विभागाचा निधी खर्च करणे याला शहाणपणा की मूर्खपणा म्हणावे, असा प्रश्न रस्त्याच्या परिसरातील नागरिकांना पडला आहे. महापालिका प्रशासनाने आम्ही हा रस्ता करणार असल्याचे सांगूनही त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष करून तो आम्हीच करणार, असा हट्ट धरला आहे.कोल्हापूर शहरातील संभाजीनगर कामगार चाळ ते निर्माण चौक, जरगनगर शेवटच्या बस स्टॉपपर्यंतचा रस्ता राज्य नगरोत्थानमधून मिळालेल्या १०० कोटींच्या निधीतून केला जाणार आहे. या रस्त्यासाठी चार कोटी ६७ लाख १७ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. महापालिकेच्या सूचनेप्रमाणे ठेकेदाराने या रस्त्यावरील सेवावाहिन्या स्थलांतराची कामे सुरू केली आहेत. पुढील चार-पाच महिन्यात रस्ता पूर्ण होणे अपेक्षित आहे. दरम्यान, निर्माण चौक ते जरगनगर शेवटच्या बस स्टॉप दरम्यानच्या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दीड कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असून त्यांनी नेमलेल्या ठेकेदाराची यंत्रणाही रस्त्याचे काम करण्यास तेथे पोहचली आहे. रस्त्याचे काम, बाजूपट्ट्या करण्यास सुरुवात झाली आहे. एकाच रस्त्याचे काम दोन ठेकेदारांना कसे, असा काही नागरिकांना प्रश्न पडल्यानंतर त्यांनी महापालिका यंत्रणेशी संपर्क करून हा प्रकार शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्या निदर्शनास आणून दिला. घाटगे यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागही करणार आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून संभाजीनगर कामगार चाळ ते जरगनगर शेवटचा बस स्टॉप हा रस्ता महापालिका शासन निधीतून करत असल्याचे सांगितले. मात्र त्या अधिकाऱ्यांनी आमचा निधी मंजूर झाला आहे, आता काम कसे थांबविणार, असा उलट प्रश्न केला. तेव्हा शहर हद्दीच्या बाहेरील रस्ता तुम्ही करावा, अशी सूचना घाटगे यांनी केली होती. पण तरीही त्यांचे न ऐकता काम सुरूच ठेवले आहे.

निधी अन्य कामांवर वळविण्यात काय अडचण?महापालिका चार कोटी ६७ लाख रुपये खर्च करणार आहे, तर सार्वजनिक बांधकाम विभाग दीड कोटी रुपये खर्च करणार आहे. याचा अर्थ महापालिका करणार असलेला रस्ता अधिक दर्जेदार व टिकाऊ असणार आहेे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आपला निधी अन्य कामांवर वळविणे आवश्यक आहे. पण त्यांना सांगायचे कोणी, असा प्रश्न पालिकेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.नाहरकत कुठे आहे..?शहर हद्दीत बांधकाम विभागाला एखादा रस्ता करायचा असेल तर त्यासाठी महापालिकेचा नाहरकत दाखला घ्यावा लागतो. त्यावेळी दोन विभागात कसा काय समन्वय झाला नाही, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूक