शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शिवाजी विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकाचा आत्मदहनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 12:40 IST

विभागप्रमुखपदावरील नियुक्तीचा मुद्दा सध्या तापला

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र (केमिस्ट्री) विभागप्रमुखपदावरील नियुक्तीचा मुद्दा सध्या तापला आहे. या विभागातील दोन प्राध्यापकांनी आपली विभागप्रमुखपदी नियुक्ती व्हावी यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यातील वरिष्ठ प्राध्यापक जी. बी. कोळेकर यांनी आत्मदहनाचा इशारा रविवारी दिला आहे.

रसायनशास्त्र अधिविभागप्रमुखपदावर सध्या कार्यरत असणारे प्रा. जी. एस. गोकावी आज, सोमवारी सेवानिवृत्त होत आहेत. विद्यापीठाच्या प्रचलित पद्धती आणि रसायनशास्त्र अधिविभागातील सेवाज्येष्ठतेनुसार दि. १ फेब्रुवारीपासून अधिविभागप्रमुखपदावर माझी नियुक्ती होणे अपेक्षित आहे.मला जर या पदावर नियुक्त केले नाही, तर हा माझ्यासाठी प्रचंड मोठा धक्का असेल. मला आत्मदहन करण्यापासून काहीही पर्याय राहणार नाही. माझ्या या मानसिक स्थितीस आपण जबाबदार असाल, अशा उल्लेखाचा ई-मेल या विभागातील वरिष्ठ प्राध्यापक जी. बी. कोळेकर यांनी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना रविवारी पाठविला आहे.दरम्यान, या अधिविभागप्रमुखपदावरील नियुक्तीबाबत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करावी. प्रा. डॉ. संजय चव्हाण यांना न्याय हक्कापासून वंचित ठेवण्यात येऊ नये. या नियुक्तीबाबत विद्यापीठाने दाखल केलेली बेकायदेशीर याचिका तत्काळ मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टीच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. शिर्के यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

प्रा. चव्हाण यांना विभागप्रमुखपदी नेमणूक देण्याबाबतच्या राष्ट्रीय अनुसूचित आयोगाच्या आदेशाचे पालन विद्यापीठाने करावे, अशी मागणी शिवाजी विद्यापीठ कास्ट्राईब महासंघाचे अतिरिक्त महासचिव आनंदराव खामकर यांनी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ