शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

उष्मा वाढला... तापमान ३४ डिग्रीपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 15:12 IST

कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असून शुक्रवारी ते ३४ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. आगामी आठ दिवस तापमानात वाढ होत जाणार आहे. हळूहळू तापमानात वाढ होत असून फेबु्रवारीपासूनच हवामान तापू लागल्याने ऐन मार्च, एप्रिलमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून, हा उष्मा नागरिकांना घामाघूम करणार हे निश्चित आहे.

ठळक मुद्देआठवड्यात पारा वाढतच जाणार मार्च, एप्रिलमध्ये घामाघूम करणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असून शुक्रवारी ते ३४ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. आगामी आठ दिवस तापमानात वाढ होत जाणार आहे. हळूहळू तापमानात वाढ होत असून फेबु्रवारीपासूनच हवामान तापू लागल्याने ऐन मार्च, एप्रिलमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून, हा उष्मा नागरिकांना घामाघूम करणार हे निश्चित आहे.साधारणत: मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून आपल्याकडे तापमानात वाढ होत जाते. एप्रिल आणि मे महिन्यांत पारा ४० डिग्रीपर्यंत पोहोचतो. मात्र यंदा फेबु्वारीच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच तापमानात वाढ होत गेली. शुक्रवारी किमान तापमान १६ डिग्री, तर कमाल तापमान ३४ डिग्रीपर्यंत पोहोचले होते. पहाटेपासून काहीसे गार वारे वाहत असले तरी सकाळी आठनंतर हळूहळू अंग तापू लागते.

दहानंतर घराबाहेर पडले तर अंगातून घामाच्या धारा येत राहतात. दुपारी बारा ते दोनपर्यंत तापमानात वाढ होत जाते. दुपारी दोन वाजता पारा ३४ डिग्रीपर्यंत पोहोचल्यानंतर अंग भाजू लागते. दुपारी घराबाहेर पडल्यानंतर उन्हाची तीव्रता जाणवू लागते. दुचाकीवरून जाणाऱ्यांचे ‘सनकोट’, स्कार्फ, टोप्या बाहेर पडल्याचे दिसते. दुपारी तीननंतर पारा हळूहळू खाली येत जातो. सायंकाळी पाचनंतर वातावरण पुन्हा गार होत जाते.किमान तापमान नियंत्रणातकमाल तापमानात वाढ झाली असली तरी अद्याप किमान तापमान नियंत्रणात आहे. किमान तापमान १६ डिग्रीपर्यंत असल्याने सकाळी व रात्री फारसा उष्मा जाणवत नाही. मात्र पुढील आठवड्यापासून किमान तापमानातही वाढ होत असून ते २१ डिग्रीपर्यंत पोहोचणार आहे.

ऊसतोडणी मजुरांचा त्रास वाढलासाखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. शिल्लक ऊस आहे तो अडचणीतील आहे. सकाळी आठनंतर उष्मा वाढत जात असल्याने ऊसतोडणी मजुरांना त्याचा त्रास होत आहे.

पिकांची पाण्याची मागणीही वाढलीतापमानवाढीचा परिणाम शेतीवरही झाला असून, पिकांची पाण्याची मागणीही वाढली आहे. जमीन तापू लागल्याने ऊस, भुईमूग, उन्हाळी भाताला जास्त पाणी लागत आहे. 

 

टॅग्स :Temperatureतापमानkolhapurकोल्हापूर