शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील नऊ नगरपालिकांंसाठी आजपासून प्रभाग रचना प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 10:47 IST

Kolhapur : प्रभाग निश्चित झाल्यानंतर आरक्षण आणि त्यानंतर उमेदवार निवडीच्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या नऊ नगरपालिकांच्या स्थगित प्रभाग रचनेची प्रक्रिया आज, मंगळवारपासून पुन्हा सुरू होत आहे. प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ जूनला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. प्रभाग निश्चित झाल्यानंतर आरक्षण आणि त्यानंतर उमेदवार निवडीच्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

मे २०२० ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या राज्यातील २०७ आणि जिल्ह्यातील ९ नगरपालिकांसाठी २२ फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाली होती. पण ११ मार्चला राज्य शासनाने नगरपंचायत, नगर परिषद, औद्योगिक नगरी अधिनियमात सुधारणा करीत प्रभाग रचनेचे अधिकार निवडणूक आयोगाकडून आपल्याकडे घेतले. यामुळे आयोगाकडून सुरू असलेले प्रभाग रचनेचे काम थांबले.

दरम्यान, ४ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर १० मार्चपासून थांबलेली प्रभाग रचनेची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. म्हणून राज्य निवडणूक आयोगाने नुकताच प्रारूप प्रभाग रचना आणि अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार जिल्हा निवडणूक प्रशासन संबंधीत नऊ नगरपालिकांच्या प्रशासनास सूचना दिल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकीच्या प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.

या नऊ नगरपालिकांची निवडणूक होणारजिल्ह्यातील मुदत संपलेल्या इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, कुरूंदवाड, मलकापूर, मुरगुड, पन्हाळा, वडगाव या नऊ नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. इचलकरंजी नगरपालिकेची आता महापालिका झाली आहे. त्यामुळे तिथे निवडणुकीचे काय होणार, याबद्दल संभ्रम आहे. आयोगाच्या नोटिफिकेशनमध्ये मात्र आजतरी या नगरपालिकेचे नांव आहे.

कार्यक्रम असा :- हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी : १० ते १४ मे- हरकती व सूचनांवर सुनावणी : २३ मे- हरकती, सूचनांचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणे : ३० मे- अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे : ६ जून- अंतिम प्रभाग रचना जाहीर करणे : ७ जून

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक