शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वारणा चोरी प्रकरण : घनवट, चंदनशिवे यांच्यासह सातजणांना दहा दिवसांची डेटलाईन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 21:33 IST

वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणातील संशयित आरोपी निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, कॉन्स्टेबल दीपक पाटील, कुलदीप कांबळे या चौघांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

कोल्हापूर, दि. 25 -  वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणातील संशयित आरोपी निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, कॉन्स्टेबल दीपक पाटील, कुलदीप कांबळे या चौघांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी अटकपूर्व जामिन फेटाळण्याचे उच्च न्यायाधीश रेवती मोहिते-ढेरे यांनी संकेत देताच आरोपींनी स्वत:हून जामीन अर्ज माघारी घेत दहा दिवसात पोलीसांत हजर राहण्याची लेखी ग्वाही दिली. त्यावर न्यायालयाने त्यांच्या अटकेसाठी पोलीसांना आदेश दिले. शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणात संगनमताने नऊ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप करणारे सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, कॉन्स्टेबल शंकर पाटील, दीपक पाटील, पोलीस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांच्याविरोधात कोडोली पोलिसांत चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. या सर्वांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले होते. या सर्वांचे अर्ज न्यायालयाने फेटाळले होते. त्यानंतर आशेपोटी पुन्हा चौघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. अशोक मुंडरगी, हर्षद निंबाळकर, सत्यवर्तक जोशी यांनी युक्तीवाद मांडला. तर सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. प्राजक्ता शिंदे यांनी व फिर्यादी झुंझार सरनोबत यांच्या वतीने अ‍ॅड. अभिजित आडगुळे यांनी युक्तीवाद मांडला. या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी उच्च न्यायाधिश मोहिते-ढेरे यांचेसमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून न्यायाधिशांनी जामीन अर्ज फेटाळण्याचे संकेत दिले. यावेळी आरोपींनी अर्ज फेटाळू नये, आम्ही स्वत:हून मागे घेवून दहा दिवसात पोलिसात हजर राहतो असे लेखी दिले. त्यावर न्यायालयाने संशयित आरोपींच्या अटकेचे आदेश राज्य गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलिसांना दिले.