शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

कोल्हापूर: वारणा'ने दूध खरेदी दरात केली वाढ, आजपासून लागू होणार नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 13:00 IST

चाऱ्याची टंचाई, पशुखाद्यात झालेली दरवाढ या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी व शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी दरवाढ देण्याची घोषणा

वारणानगर : अवकाळी पावसामुळे निर्माण झालेली चाऱ्याची टंचाई, पशुखाद्यात झालेली दरवाढ या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी व शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी गायीच्या खरेदी दुधाला प्रति लिटर ३ रुपयांची तर म्हैस दुधाला प्रति लिटर २ रुपयांची दरवाढ देण्याची घोषणा वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केली.दिवाळी सणाच्या तोंडावर ही दरवाढ मिळाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत असून, ही दरवाढ शुक्रवार, दि. २१ रोजी (आज) पासून लागू केली जाणार आहे. शेतकऱ्यांना दूध दरवाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.यावेळी डॉ. कोरे म्हणाले, गाय दुधासाठी ३.५ फॅटला व ८.५ एस. एन. एफ. ला ३५ रुपये दर मिळणार आहे तर म्हैस दुधासाठी ६.० फॅट व ९.० एस. एन. एफ. ला ४७.५० पैसे इतका उच्चांकी दर मिळणार आहे. संघाने लम्पी स्कीन आजारावर मोहीम सुरू करून दीड लाखांवर मोफत लस जनावरांना दिली. अमृत पशुधन सुरक्षा कवच योजनेतून ३० लाख रुपयांचे अनुदान दूध उत्पादकांना दिले आहे. अल्पदरात पशुवैद्यकीय सेवा व रेडी संगोपनसारखे उपक्रम संघामार्फत राबविले जात असल्याचे कार्यकारी संचालक येडूरकर यांनी सांगितले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, अकौंटस् मॅनेजर सुधीर कामेरीकर, संकलन व्यवस्थापक डॉ. अशोक पाटील, मार्केटिंग इन्चार्ज अनिल हेर्ले उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVinay Koreविनय कोरेmilkदूध