शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

रताळे, खजूर, फळांची बाजारात रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 17:14 IST

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात रताळे, खजूर, फळांची रेलचेल वाढली आहे. आवक चांगली असली तरी मागणी वाढल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. दोन-तीन भाज्यांचा अपवाद वगळता इतर भाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले आहेत. कडधान्यांच्या दरात थोडी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देरताळे, खजूर, फळांची बाजारात रेलचेलभाजीपाल्याचे दर स्थिर : कडधान्यांच्या दरात थोडी वाढ

कोल्हापूर : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात रताळे, खजूर, फळांची रेलचेल वाढली आहे. आवक चांगली असली तरी मागणी वाढल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. दोन-तीन भाज्यांचा अपवाद वगळता इतर भाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले आहेत. कडधान्यांच्या दरात थोडी वाढ झाली आहे.रविवारपासून नवरात्रौत्सव सुरू झाला आहे. त्यामुळे उपवासासाठी लागणाऱ्या पदार्थांची रेलचेल बाजारात पाहावयास मिळत आहे. साधारणत: सफरचंद, मोसंबी, संत्री, केळी, चिक्कू या फळांना मागणी अधिक असते. त्यानुसार या फळांची आवक बाजारात अधिक असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात थोडी वाढ झाली आहे. सफरचंद किरकोळ बाजारात ६० पासून १०० रुपये किलोपर्यंत आहेत. पेरू ५० रुपये किलो, तर केळीचा दर ३० रुपये डझन आहे.

मोठ्या पेरूला चांगला दर असून तो साधारणत: १५० रुपये किलो आहे. रविवारी कोल्हापूर बाजार समितीत रताळ्यांची आवक २४५९ पोती झाली आहे. घाऊक बाजारात सरासरी ३० रुपये किलो दर असला तरी घाऊक बाजारात ४० ते ५० रुपये दर आहे. खजूरची आवकही चांगली आहे. प्रतवारीनुसार खजूरचा दर असून ६० पासून १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. नवरात्रौत्सवाचा पहिला दिवस असल्याने उपवासाच्या पदार्थांच्या खरेदीसाठी गर्दी दिसत होती.तूरडाळ, हरभरा डाळीच्या दरांत काहीशी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळ प्रतिकिलो १००, तर हरभराडाळ ६५ रुपये दर आहे. शाबू ८० रुपयांवर स्थिर असून उर्वरित धान्याच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही. परतीच्या पावसाने टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे आवक काहीशी कमी झाल्याने दर तेजीत आहेत.

किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये किलो दर आहे. ऐन उन्हाळ्यात लालभडक टोमॅटो १० रुपये किलो होता; पण आता पावसामुळे डागाळलेला टोमॅटोला दुप्पट पैसे द्यावे लागत आहेत. गवार, पापडी वाल, फ्लॉवरच्या दरात वाढ झाली आहे. मेथी १५, तर शेपू १० रुपये पेंढी आहे. ओल्या भुईमूग शेंगांची आवक सुरू असून ६० रुपये किलो दर आहे.

कांद्याचे दर घाऊक बाजारात प्रतिकिलो ४० रुपयांपर्यंत असून बटाट्याचे दर मात्र स्थिर राहिले आहेत. किरकोळ बाजारात बटाट्याचा दर २० रुपये किलो राहिला आहे. दसºयाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांची आवकही मोठ्या प्रमाणात आहे. दर १०० रुपये प्रतिकिलो आहे.सणासुदीच्या तोंडावर साखर तेजीतसाखरेला चांगला भाव मिळत असून, सध्या किरकोळ बाजारात ३८ ते ४० रुपये किलो दर आहे. दसरा आणि त्यानंतर येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखर तेजीत होण्याचे संकेत व्यापारी वर्गाकडून मिळत आहेत. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर