कोल्हापूर : विसर्जन मिरवणूक सुरू असताना काल, सोमवारी दुपारी चारच्या सुमारास महाद्वार रोडवरील अराध्य व वांगी बोळ येथील ७० वर्षांपूर्वीच्या तिन मजली जुन्या घराची समोरील भिंत पावसाने कोसळली. अचानक हा प्रकार पडल्याने गोंधळ उडाला. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पोवार कुटुंबीय पाठीमागे राहत असल्याने जीवितहानी टळली; परंतु त्यांच्या प्रापंचिक साहित्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महाद्वार रोडवर गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. दुपारी पाऊस सुरू असताना अराध्य बोळ येथे संदीप पोवार यांच्या ७० वर्षांपूर्वीच्या जुन्या तीन मजली घराची भिंत अचानक कोसळली. भिंत कोसळल्याचे वृत्त शहरात पसरताच गोंधळ उडाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत भिंतीखाली कोणी सापडले आहे का, याची पाहणी केली. प्रापंचिक साहित्य भिंतीखाली दडपलेहोते. घरातील लोक पाठीमागे राहत असल्याने जीवितहानी झाली नाही. पोवार यांच्या भावंडामध्ये घराच्या वाटण्या झाल्या. त्यानुसार दुसऱ्या भावाने घराच्या समोरील बाजू चार दिवसांपूर्वी उतरून घेतली. संदीप हे पाठीमागे राहत असल्याने त्यांनी याला विरोध केला होता.
विसर्जन मिरवणुकीवेळी भिंत कोसळली
By admin | Updated: September 10, 2014 00:39 IST