शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

शक्तिप्रदर्शन करीत निघाल्या पदयात्रा

By admin | Updated: July 24, 2015 00:41 IST

प्रचाराची सांगता : उमेदवारांनी शक्ती लावली पणाला

आयुब मुल्ला -खोची -मतांची बेरीज पक्की करीत विजयासाठी आवश्यक असणारे समीकरण सोडविण्यासाठी उमेदवारांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. यासाठी अद्यापही अळमडळम असणाऱ्या मतदारांना आपलसं करण्यासाठी सर्व नितीचा अवलंब करण्यास आज आणि उद्याचा दिवस उमेदवारांच्या हातात आहे. अशी काठावरची असणारी मते अन् त्या मतदारांचा भाव मात्र बहुमोल ठरू पाहत आहे. गुरुवारी प्रचाराची सांगता पदयात्रेने झाली. या पदयात्रेत कोण सामील होते हे पाहण्यासाठी परस्पर विरोधी उमेदवारांनी आपली यंत्रणा लावली होती. यातूनच वरील निष्कर्षापर्यंत पोहोचून उर्वरित मतदान आपलंसं करण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे.हातकणंगले तालुक्यातील सतरा गावांत काटाजोड लढती होत आहेत. जाहिरातबाजीपासून ते खिसा रिकामा होण्यापर्यंत उमेदवारांनी कसूर ठेवलेली नाही. सर्वसाधारण गटासाठी सरपंचपद असलेल्या गावांत तर कमालीची चुरस पाहावयास मिळत आहे. बुधवारी अर्थकारणाची चळवळ गावातील प्रभागनिहाय अगदी छुप्या पद्धतीने झालेली पाहावयास मिळाली. कितीच्या मोबदल्यात किती मते मिळतात याचा हिशेबही केला. यावरून तालुक्यातील शेकडो उमेदवारांनी आपला हात सैल सोडत मतदारांना मदत केली.आज सकाळपासून पॅनेलनिहाय गावांतून प्रचाराची पदयात्रा निघाल्या. सायंकाळी चार वाजेपर्यंत जाहीर प्रचाराची मुदत होती. सर्वांनीच भव्य शक्तिप्रदर्शन करीत गाव पिंजून काढला. बोळ अन् बोळसुद्धा सोडली नाहीत. विजयाच्या घोषणा, नम्र अभिवादन करीत मतदान द्या, असे आवाहन या रॅलीद्वारे करण्यात आले. पॅनेलप्रमुख, आघाडीतील सदस्य, समर्थक, कार्यकर्ते रॅलीच्या माध्यमातून मतदारांसमोर गेले.मतदारांनी मात्र, रॅलीचे स्वागत करीत समर्थन आहे, अशी पोझ दिली; परंतु या रॅलीत कोण आहे, हे पाहण्यासाठी प्रत्येकाने स्वतंत्र यंत्रणा लावली होती. रॅली झाल्यानंतर याचा सविस्तर अहवाल उमेदवारांसह पॅनेलप्रमुखांना मिळाला. तेव्हापासून पुढची दिशा ठरविण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली. जे कार्यकर्ते आजपर्यंत उघड प्रचारात नव्हते त्यांचेही गुरुवारी दर्शन झाले.मतांची बेरीज करून विजयाची ठाम खात्री व्हावी, याचाही अंदाज बांधण्यास सुरुवात झाली. त्यामुळे काठावरच्या म्हणजे अळमडळम मतदारांना आपल्याच समर्थनार्थ करण्यासाठी सायंकाळपासून सर्व प्रकारची यंत्रणा गतिमान झाली. शुक्रवारी रात्रीपर्यंत ती अधिक गतिमान होईल. गुरुवारी रॅलीने गावागावांत शक्तिप्रदर्शन करण्यात आले.