शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘वन्यजीव’च्या ‘एनओसी’ची प्रतीक्षा

By admin | Updated: December 31, 2014 00:11 IST

काम ‘जैसे थे’च : शिवडाव-सोनवडे घाटरस्ता

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा सर्वांत जवळचा मार्ग असलेल्या शिवडाव-सोनवडे घाटरस्त्याचे काम सुरू होण्यासाठी वन्यजीव विभागाकडून ‘एनओसी’ची आवश्यकता आहे. मात्र, अद्याप ‘एनओसी’ न मिळाल्याने काम अद्याप ‘जैसे थे’ आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १७ डिसेंबरला विधानभवन, नागपूर येथे वनविभाग व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतरही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नव्या वर्षात तरी घाटरस्त्याचे काम पूर्ण होणार का, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.कोल्हापूर व सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे जोडणाऱ्या शिवडाव घाटरस्त्याचे काम २००८-२००९ पासून वन व वन्यजीव संरक्षण खात्याची परवानगी न मिळाल्यामुळे रखडले. या घाटासाठी आवश्यक असणारी पर्यायी जमीन २००८ मध्ये वनविभागास नांदेड जिल्ह्यातील दहिकळंब (ता. कंधार) येथील १० हेक्टर व लिनगव्हाण (ता. नायगाव) येथील १० हेक्टर अशी एकूण २० हेक्टर व कोल्हापूर जिल्ह्यातील ९.२२ हेक्टर देण्याचे मान्य केले आहे. त्यानंतर हा रस्ता करण्यास वनविभागाने परवानगी दिली. दरम्यान, या रस्त्याची आखणी ही राधानगरी वन्यजीव उद्यान सीमेपासून १० किलोमीटरच्या आत असल्याने यासाठी वनसंरक्षक, वन्यजीव विभागाच्या परवानगीची आवश्यकता आहे. ही परवानगी नसल्यामुळे घाटाचे अद्याप काम सुरू झालेले नाही. घाटरस्ता मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला तसेच वेळोवेळी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र, अद्यापही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.या रस्त्याचे रखडलेले काम सुरू व्हावे, यासाठी मंत्री पाटील विशेष प्रयत्न करत आहेत. बैठकीनंतर दहा दिवसांत ‘वन्यजीव’विभागाकडे ‘एनओसी’साठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव पाठविला आहे पण अजूनही ‘एनओसी’ मिळालेली नाही.