सावरवाडी : अकराव्या शतकातील पुण्यभूमी असलेल्या कसबा बीड (ता. करवीर) गावच्या पूर्व बाजूस प्राचीन काळापासून असलेल्या मरगाबाई मंदिराच्या जिर्णोद्धाराकडे दुर्लक्ष झाले आहे. हे मंदिर कित्येक वर्षे दुरावस्थेत आहे. सध्या हे मंदिर जिर्णाेद्वाराच्या प्रतिक्षेत आहे. दरवर्षी गावात मरगाबाईच्या नावानं माही साजरी केली जाते. शासकीय निधीअभावी गेल्या ३० वर्षांपासून या मंदिराचे नव्याने बांधकाम रखडले गेले आहे. प्राचीन ऐतिहासिक पुण्यभूमी म्हणून कसबा बीड गावाची ओळख आहे. मरगाबाई मंदिराच्या छताचे लाकडी साहित्य खराब झाले आहे. प्राचीन काळात बांधलेल्या भिंती खराब झाल्या आहेत. मंदिरावरील कौले उडून पडली आहेत. मंदिरासमोरील दगडी फरशीही खराब झाली आहे. मरगाबाई मंदिराचा जिर्णाेद्धार होण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
मरगाबाई मंदिर जिर्णोद्वाराच्या प्रतिक्षेत
By admin | Updated: August 3, 2014 22:43 IST