कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावरील तीन चित्रपटांना सेन्सॅारची संमती मिळाली आहे. या चित्रपटांच्या प्रदर्शनाची पूर्वतयारी सुरू असल्याची माहिती राजर्षी शाहू कृतज्ञता प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी रविवारी दिली.अक्षरदालन आणि निर्धारतर्फे आयोजित अक्षरगप्पांच्या ११७ व्या कार्यक्रमामध्ये प्रकट मुलाखतीदरम्यात त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘आम्ही डिजिटल स्वरूपामध्ये २४ तासांचे चित्रीकरण पहिल्यांदा निश्चित केले. त्यातील प्रत्येकी तीन तासांच्या तीन चित्रपटांची निर्मिती केली. त्याला सेन्सॅारची संमतीही मिळाली आहे. हे चित्रपट कसे प्रदर्शित करायचे याबाबतही नियोजन सुरू आहे.’या वेळी एक प्रथितयश बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ता, कला, क्रीडा, आरोग्य, गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रांतील संस्थांचे यशस्वी नेतृत्व करत असलेल्या पाटील यांच्या चौफेर कार्याचा आढावा या प्रकट मुलाखतीत घेतला. रवींद्रनाथ जोशी यांनी स्वागत केले. पाटील यांनी बांधकाम व्यवसायातील जडणघडणीचा प्रवास उलगडला. विविध संस्थांवर कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी सतीश चव्हाण, नरेश बगरे, माजी जिल्हाधिकारी दिलीप जाधव, आर. के. पोवार, राजूभाई दोशी, रवींद्र तेंडुलकर, बबन देसाई, नितीन पाटील, रमेश पुरेकर, अनिल घाटगे, पद्मा तिवले, आदी उपस्थित होते.
छत्रपती शाहू महाराजांवरील तीन चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत, व्ही .बी. पाटील यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 14:52 IST