शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गौरी लंकेश हत्याप्रकरणी वाघमारेची केवळ दोन तासच होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 13:30 IST

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारे याची रोज केवळ दोन तासच चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. वाघमारेला गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी महाराष्ट्र ‘एसआयटी’ पथकाकडे सुपूर्द करण्याची मागणीही कर्नाटक ‘एसआयटी’ पथकाने फेटाळली आहे.

ठळक मुद्देगौरी लंकेश हत्याप्रकरणी वाघमारेची केवळ दोन तासच होणार चौकशीसंशयितास महाराष्ट्राच्या ताब्यात देण्यास कर्नाटक ‘एसआयटी’चा नकार

कोल्हापूर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारे याची रोज केवळ दोन तासच चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. वाघमारेला गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी महाराष्ट्र ‘एसआयटी’ पथकाकडे सुपूर्द करण्याची मागणीही कर्नाटक ‘एसआयटी’ पथकाने फेटाळली आहे.ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येचा ‘किलर’ असल्याचे काही महत्त्वाचे पुरावे बंगलोर ‘एसआयटी’च्या हाती लागले असल्याचे सूत्रांनी सांगितले. संशयित वाघमारेकडे चौकशी करण्यासाठी महाराष्ट्राच्या ‘एसआयटी’चे विशेष पथक रविवारी रात्री बंगलोरला रवाना झाले, परंतु या पथकाला हात हलवत परत यावे लागणार आहे, कारण कर्नाटकच्या पथकाने वाघमारेला महाराष्ट्राच्या ताब्यात देण्यास नकार दिला आहे.गौरी लंकेश यांच्यासह प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि कॉ. पानसरे या तिघांच्या हत्येसाठी एकाच पिस्तुलाचा वापर केल्याची कबुली संशयित वाघमारे याने दिल्याने महाराष्ट्र ‘एसआयटी’चे विशेष पथक वाघमारे याच्याकडे चौकशी करण्यासाठी रविवारी रात्री बंगलोरला रवाना झाले होते.

तीन वर्षांनी पानसरे हत्येसंबंधी महत्त्वाचा दुवा हाती लागल्याने महाराष्ट्राच्या  ‘एसआयटी’ पथकाने वाघमारेचा ताबा कर्नाटकच्या पथकाकडे मागितला आहे, मात्र, कर्नाटक पथकाचा तपास पूर्ण झाल्याशिवाय वाघमारेला ताब्यात देता येणार नसल्याचे सांगून महाराष्ट्राची विनंती कर्नाटकने फेटाळली आहे.दरम्यान, कर्नाटकच्या ‘एसआयटी’ पथकाने वाघमारेची चौकशी सुरु केली असून रोज केवळ दोनच तास त्याची चौकशी करण्याचे बंधन घालण्यात आल्याचे समजते. कर्नाटकच्या ‘एसआयटी’ने मात्र गौरी लंकेश हत्येच्या तपासातून पानसरे व कलबुर्गी या दोन्ही हत्यांचा संशयित वाघमारे हा महत्त्वाचा दुवा पुढे आणला आहे. वाघमारेच्या आतापर्यंतच्या चौकशीत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विचारवंतांच्या हत्या करणारा एकाच विचाराचा गट आहे, असे निष्पन्न झाले आहे.गौरी लंकेश यांच्या हत्येची सुपारी ‘मुन्ना’ नामक व्यक्तीने दिल्याची कबुली संशयित वाघमारे याने दिली आहे. त्याला प्रवृत्त करणाऱ्या या ‘मुन्ना?’ची माहिती कर्नाटकचे एसआयटी पथक केवळ दोन तासातच कसे शोधून काढणार हा प्रश्नच आहे.महाराष्ट्राचे एसआयटी पथक पानसरे हत्येचा गेली तीन वर्षे तपास करीत आहे. त्यांच्या हाती संशयित गायकवाड व तावडे लागले. वाघमारे हा आतापर्यंतच्या तपासामध्ये कुठेच आला नाही. असे समजते की सनातन संस्थेचा फरार साधक विनय पवारसोबत परशुराम वाघमारेही कोल्हापूरात येउन गेला होता, मात्र याबाबत ठोस पुरावा मिळालेला नाही.

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक