लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : लाॅकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही शहरात शुकशुकाट होता. या काळात विनाकारण फिरणाऱ्या मोटारसायकलस्वार, वाहनचालकांवर वाठार येथे पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आली. २० मोटारसायकलस्वारांवर खटले, ४० वाहनांवर दंडात्मक कारवाई, १५ विनामास्क कारवाई करण्यात आली. कायम गजबजलेल्या पालिका, एस. टी. स्टँड, बिरदेव चौकात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील रुग्णसंख्या तीनशेपर्यंत पोहोचली आहे.
वडगाव शहरात पालिका चौक, विजयसिंह यादव चौकात पोलिसांच्यावतीने कारवाई केली. २० मोटारसायकलस्वारावर खटले दाखल केले तर ४० मोटारसायकलस्वारावर १७ हजार पाचशे दंड,तर १५ विनामास्क नागरिकांवर १५०० रुपये दंड वसूल करण्यात आला तसेच वाठार येथेही पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी यांनी धडक कारवाई केली. यावेळी हवालदार बाबासाहेब दुकाने, पोलीस नाईक विशाल हुबाले,रजनीकांत वाघमारे, धोंडिराम वड्ड यांच्या पथकाने केली.
दरम्यान, आज दुसऱ्या टप्प्यात ३०३ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. त्यातील सात रुग्ण मृत्यू झाले आहेत तर ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील तब्बल २३६ रुग्ण बरे झालेले आहेत.
0000
फोटो कॅप्शन : वाठार येथील बसस्थानक परिसरात वडगाव पोलिसांनी वाहनचालकांवर कारवाई केली.