शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

ग्रामपंचायतींसाठी २२ एप्रिलला मतदान

By admin | Updated: March 25, 2015 00:42 IST

आचारसंहिता लागू : जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर; ४२ ठिकाणी पोटनिवडणुका

कोल्हापूर : ‘ग्रामीण भागातील राजकारणाची पहिली पायरी’ म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते अशा जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला. या सर्व ग्रामपंचायतींसह ४२ ठिकाणच्या पोटनिवडणुकीसाठी २२ एप्रिलला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील जवळपास निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींत निवडणुका होत असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाने मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक होत आहे तेथे मंगळवारी रात्रीपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ३१ मार्च ते ७ एप्रिलअखेर उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. ८ एप्रिलला छाननी होणार आहे. १० एप्रिलला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेतले जातील. त्याच दिवशी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. २२ एप्रिलला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान घेतले जाणार आहे तर २३ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरतानाच जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करायचे आहे. प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी तेथील तहसीलदार निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने नुकतीच जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी प्रत्येक तालुकानिहाय पर्यवेक्षक व समन्वयक म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे असून कंसातील तालुक्यासाठी ही नियुक्ती आहे. प्रशांत पाटील (करवीर), रवींद्र खाडे (पन्हाळा), मोनिकासिंग (राधानगरी) कीर्ती नलवडे (भुदरगड), कुणाल खेमनार (गडहिंग्लज), अश्विनी जिरंगे (हातकणंगले), विद्युत वरखेडकर (शाहूवाडी), संगीता चौगुले (कागल), स्वाती देशमुख (गगनबाबडा), विवेक आगवणे (चंदगड), शैलेश सूर्यवंशी (आजरा), संजय पवार (शिरोळ) यांना नियुक्तीची पत्रे देण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणारग्रामपंचायतीची निवडणूक घराघरांपर्यंत पोहोचलेली असते. निवडणुकीमुळे प्रत्येक गावातील वातावरण राजकीयदृष्ट्या ढवळून निघणार आहे. या निवडणुका गावातीलच गटांतर्गत लढविण्यात येतात. त्यामुळे गावा-गावांतील राजकीय इर्ष्या, गटबाजी शिगेला पोहोचलेली पाहायला मिळणार आहे. तालुकानिहाय ग्रामपंचायती अशामतदान होत असलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती अशा - करवीर ५४, कागल ५३, पन्हाळा ४१, शाहूवाडी ३७, शिरोळ ३४, हातकणंगले २०, राधानगरी २०, भुदरगड ४२, गगनबावडा ८, आजरा २६, चंदगड ३९, गडहिंग्लज ४८.