शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरू

By admin | Updated: July 13, 2016 00:42 IST

अमित सैनी : प्रभागनिहाय, महाविद्यालयांमध्ये अर्ज स्वीकृती केंद्रे; ३१ आॅगस्टपर्यंत मुदत

कोल्हापूर : जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठीच्या मतदार नोंदणी अभियान व प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. यासाठी नगरपरिषदेमध्ये प्रभागनिहाय व महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणीची अर्ज स्वीकृती केंद्रे सुरू केली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व जिल्हा प्रशासनाधिकारी नितीन देसाई यांनी मंगळवारी येथे दिली.जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, नोव्हेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ या कालावधीत इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल, वडगाव, गडहिंग्लज, कुरुंदवाड, मुरगूड, मलकापूर, पन्हाळा या नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने दि. १० सप्टेंबर २०१६ ची मतदार यादी ग्राह्ण धरण्याची सूचना केली आहे. या निवडणुकीसाठी विधानसभेची दि. १ जानेवारीची मतदार यादी आणि १० सप्टेंबरपर्यंत नावे नोंद असलेली पुरवणी यादी वापरली जाणार आहे. त्यामुळे नवीन मतदार नोंदणी, नावांमध्ये दुरुस्ती, नाव वगळणे, आदी स्वरूपांतील प्रक्रियांचा प्रारंभ झाला आहे. यासाठी प्रभागनिहाय आणि महाविद्यालय पातळीवर अर्ज स्वीकृती केंद्रे सुरू केली आहेत. देसाई म्हणाले, महाविद्यालयांच्या पातळीवर पहिल्यांदाच केंद्रे सुरू केली आहेत. नगर परिषदेच्या हद्दीत सर्वसाधारण वास्तव्यास असणाऱ्या व १ जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या नागरिकांना नावनोंदणी करता येणार आहे. त्याची माहिती अर्ज स्वीकृती केंद्रांवर देण्यात येईल. कुरुंदवाड व पन्हाळ्यामधील महाविद्यालयातील केंद्रे लवकरच जाहीर केली जातील. मतदार यादीत नावनोंदणी, दुरुस्ती व नाव वगळण्याची अंतिम मुदत ३१ आॅगस्टपर्यंत आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील महाविद्यालयीन केंद्रेइचलकरंजी : डी. के. एस.सी. कॉलेज, गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जयवंत महाविद्यालय. जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज, घोडावत कन्या महाविद्यालय. कागल : डी. आर. माने महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय. वडगाव : बळवंतराव यादव ज्युनिअर कॉलेज, वडगाव विद्यालय, अशोकराव माने आयजीआयटी (फार्मसी), इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय. गडहिंग्लज : शिवराज कॉलेज, ओंकार कॉलेज, साधना कॉलेज, एस. एन. कॉलेज, गडहिंग्लज हायस्कूल, डॉ. घाळी महाविद्यालय. मुरगूड : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय. मलकापूर : प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय, ग. रा. वारंगे ज्युनिअर कॉलेज.