शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीचा घोळ मिटेना, अधिकारी गेले चक्रावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 13:37 IST

Muncipal Corporation Kolhapur-प्रभाग रचना व आरक्षणाचे काम चांगले केले म्हणून कौतुकाचे धनी ठरलेले महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मतदार याद्या तयार करण्याच्या कामात मात्र फेल गेले आहेत. मतदार याद्यांवर आलेल्या भरमसाठ हरकती निकालात काढता काढता उत्तररात्रीपर्यंत अधिकारी जागत आहेत. एखादे काम बेजबाबदारपणे केले की त्याचा त्रास नंतर किती होतो याचा अनुभव ते घेत आहेत.

ठळक मुद्देमतदार यादीचा घोळ मिटेना, अधिकारी गेले चक्रावूनमुदतीत तब्बल १८०० हरकती दाखल

कोल्हापूर : प्रभाग रचना व आरक्षणाचे काम चांगले केले म्हणून कौतुकाचे धनी ठरलेले महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मतदार याद्या तयार करण्याच्या कामात मात्र फेल गेले आहेत. मतदार याद्यांवर आलेल्या भरमसाठ हरकती निकालात काढता काढता उत्तररात्रीपर्यंत अधिकारी जागत आहेत. एखादे काम बेजबाबदारपणे केले की त्याचा त्रास नंतर किती होतो याचा अनुभव ते घेत आहेत.महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. दि. १६ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या. त्यावर दि. २३ फेब्रुवारीपर्यंत हरकती सादर करायच्या होत्या. या मुदतीत तब्बल १८०० हरकती दाखल झाल्या.

एवढ्या मोठ्या संख्येने हरकती दाखल झाल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कामातील उथळपणा स्पष्ट झाला. दि. ३ मार्चपर्यंत अंतिम मतदार याद्या जाहीर करायच्या असल्यामुळे कमीत कमी वेळात १८०० हरकतींवर निर्णय घ्यायचा होता, प्रत्यक्षात क्षेत्रभेटी देऊन याद्या निर्दोष करायच्या होत्या; परंतु प्रारुप याद्याच चुकीच्या केल्या गेल्याचा परिणाम महापालिका प्रशासनाला भोगावे लागत आहेत.

प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या दि. २ मार्चपर्यंत तयार करून त्या आयोगाला सादर करायच्या होत्या; परंतु यादीतील घोळ काही केल्या मिटता मिटत नसल्याने आज नाही उद्या आयोगाला पाठविणार आहोत, असे सांगण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. थोडा विलंब झाला तरी चालेल, पण निर्दोष याद्या तयार करून त्या आयोगाकडे पाठविण्यात येतील, असे उपायुक्त रविकांत आडसुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर