शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

मतदार जनजागृती; कोल्हापूरात साडेदहा हजार विद्यार्थ्यांनी साकारली विक्रमी मानवी रांगोळी

By विश्वास पाटील | Updated: March 19, 2024 15:40 IST

'नॅशनल रेकॉर्ड', 'एशिया पॅसिफीक रेकॉर्ड'ची नोंद, विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग

कोल्हापूर : लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत सुरू केलेल्या मतदार जनजागृती अभियानामधील स्वीप अंतर्गत कोल्हापूर शहरातील गांधी मैदानावर आज, मंगळवारी सकाळी 10 हजार 495 विद्यार्थ्यांनी विक्रमी अशी मानवी रांगोळी साकारून मतदारांना मतदान करण्याचा संदेश दिला.यावेळी शहरातील अडतीसहून अधिक शाळांनी सहभाग नोंदवून जिल्हयाला राष्ट्रीय स्तरावरील नवीन विक्रम नोंदविण्यात मोलाची भर घातली. ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रीसर्च फौडेशनचा “नॅशनल रेकॉर्ड” व “एशिया पॅसिफीक रेकॉर्ड” ची नोंद झाली. यावेळी मिळालेला सन्मान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित विद्यार्थी त्यांचे पालक व सर्व शिक्षकांना समर्पित केला. जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, देशस्तरावर नोंद झालेल्या या उपक्रमातून मतदारांना चांगला संदेश जाईल, यातून निश्चितच मतदान टक्केवारी वाढण्यास भर पडेल. या उपक्रमाला मनपा आयुक्त के.मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, अतिरीक्त मनपा आयुक्त केशव जाधव, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, जिल्हा उपनिबंधक तथा नोडल अधिकारी स्वीप नीलकंठ करे, ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रीसर्च फौडेशनचे निरीक्षक डॉ.महेश कदम, वर्षा परिट, धायगुडे उपस्थित होते.सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन 2024 साठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिने विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. ते म्हणाले, जिल्हयातील सर्वच मतदारांपर्यंत संदेश जाईल की आपण बाहेर पडून 7 मे रोजी मतदान केले पाहिजे. लोकशाहीच्या या सर्वोच्च उत्सवात सहभागी होवून मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.कोल्हापूर मनपाच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी कोल्हापूर जिल्हयातील मागील निवडणूकीच्या मतदान टक्केवारीत अधिक भर टाकत शंभर टक्के मतदानाजवळ जावू अशी आशा व्यक्त केली.मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी लोकशाहीतील सर्वात मोठा सण असलेल्या निवडणूकीमधे नागरिकांनी आपला हक्क बजावला पाहिजे असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना आपल्या लोकशाहीची, निवडणूक प्रक्रियेची माहिती अशा उपक्रमातून आतापासूनच दिली जात असल्याचे सांगितले.यानंतर ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रीसर्च फौडेशनचे निरीक्षक डॉ.महेश कदम यांनी चेन्नई शहरानंतर भारतात असा उपक्रम नोंदविला गेल्याची घोषणा केली. या विक्रमी नोंदीचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह डॉ.कदम यांनी जिल्हधिकारी, आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVotingमतदानElectionनिवडणूक