शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
4
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
5
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
6
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
7
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
8
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
9
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
10
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
11
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
12
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
14
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
15
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
16
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
17
लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
18
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
19
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
20
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

हत्या करून विवेकाचा आवाज संपत नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 19:03 IST

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर आता प्रबोधनाचे काम करणाºया महिला पत्रकारांनाही गोळ््यांचे लक्ष्य बनवण्यात आले आहे. पण विवेकाचा आवाज हत्येने कधीच मरत नसतो, अशाी प्रतिक्रिया कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.

कोल्हापूर : दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर आता प्रबोधनाचे काम करणाºया महिला पत्रकारांनाही गोळ््यांचे लक्ष्य बनवण्यात आले आहे. पण विवेकाचा आवाज हत्येने कधीच मरत नसतो. या घटनांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे अन्यथा देशात अशी अराजकता माजेल ती थांबवणे शासनाच्याही हातात राहणार नाही अशाी प्रतिक्रिया कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.

बेंगलोर येथील पत्रकार व डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची मंगळवारी हत्या करण्यात आली. याबाबत कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते व डाव्या विचारसरणीच्या लोकांनी लोकशाहीबाबत चिंता व्यक्त केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही आणि सत्याच्या बाजूने बोलणाºयांना एक एक करुन मारले जात आहे. मात्र अशा गोळ््या झाडून सत्याला कोणी झाकून ठेवू शकत नाही. गेल्या चार पाच वर्षात झालेल्या या हत्यांबाबत सरकारने गांभीर्याने पाऊले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कलबुर्गींच्या मारेकºयांना पकडण्याला सरकारला अद्याप यश मिळालेले नाही या घटनेचा आम्ही काही दिवसांपूर्वी निषेध केला. याविषयावर २६ तारखेला मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्यानंतर गौरी लंकेश यांच्याशी दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येविषयी चर्चा झाली व निषेध सभा आयोजित करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बेंगलोरमध्ये भेटणार होतो. पण त्याआधीच एक निर्भीड पत्रकार अशारितीने मारली गेली. त्यांचे मारेकरी कोण आहेत, त्यांची विचारसरणी कोणती हे अद्याप स्पष्ट नसले तरी एखाद्याचे विचार पटत नाहीत म्हणून त्यांना मारणे ही निषेधार्हच बाब आहे.मेघा पानसरे ,सामाजिक कार्यकर्त्या

आपण एकतर भित्रे झालो आहोत, स्वत:मध्ये मग्न आहोत किंवा आळशी झालो आहोत असे म्हणावे लागेल. सध्याच्या शासनाला हेच करायचे होते म्हणून सत्तेची अभिलाषा बाळगली होती असे खेदाने म्हणावे लागेल. लोकशाहीत पत्रकारिता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचे असते. पत्रकार समाजात घडत असलेल्या गैर आणि चुकीच्या गोष्टी प्रकाशात आणून त्यावर अंकुश ठेवण्याचे काम करत असतो. गौरी लंकेश सारख्या पत्रकाराची अशी हत्या होणे म्हणजे लांछनास्पद गोष्ट आहे. शासनाने याकडे अतिशय गांभीर्याने पाहून दोषींना शिक्षा करावी अन्यथा देशात निर्माण होणारी अराजकता रोखण्यापलिक़डे जाईल.सीमा पाटील,अंधश्रद्धा निर्मूलन समिती

बेंगलोर, धारवाड, कोल्हापूर, सांगली, सातरा हा भाग जातीयवादी धर्मांध शक्तींच्या टार्गेटवर आहे. पानसरे आणि दाभोलकरांच्या हत्याप्रकरणातील लोकांना सोडल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. समाजसुधारणेचे काम करणाºया पूरुषांसोबत महिलांनीही हत्या करण्यापर्यंत याची मजल गेली आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. या विरोधात आम्ही देशभर इंडिया अगेन्स्ट फॅसीझम ही चळवळ उभी करणार आहोत.गिरीष फोंडे,एआयवायएफ