शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

राधानगरी तालुका संघावर विठ्ठलराव खोराटे व वसंतराव पाटील यांची सत्ता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2023 20:53 IST

१५ पैकी १५ जागेवर सताधारी विजयी, संघाच्या स्थापनेपासून प्रथमच निवडणूक लागल्याने या निवडणूक निकालाकडे तालुक्याचे लक्ष  लागले होते.

दता लोकरे 

सरवडे :राधानगरी तालुका संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ गटाच्या विठ्ठलराव खोराटे व वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहु विकास आघाडीने १५ जागेवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. विरोधी  शरद पाडळकर व शुभांगी खोराटे यांच्या नेतृत्वाखालील शिवशंकर परिवर्तन आघाडीचा दारुण पराभव झाला.

संघाच्या स्थापनेपासून प्रथमच निवडणूक लागल्याने या निवडणूक निकालाकडे तालुक्याचे लक्ष  लागले होते. निवडणुकीसाठी १५ जागेसाठी २५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. काल झालेल्या मतदानात संघाच्या ५८६५ व्यक्ती सभासदापैकी ३७७३ सभासदानी मतदानाचा हक्क बजावला  होता.तर संस्था गटासाठी १०५ पैकी १०५ मतदाराने हक्क बजावला.आज सकाळी दहा वाजता संस्था गटाचा पहिला  निकाल जाहीर झाला. यामध्ये राजर्षी शाहु आघाडीचे  वसंतराव पाटील ९२ ,विठ्ठलराव खोराटे ८९,बंडा पाटील ६७ मते घेऊन विजयी झाले. तर व्यक्ती सर्वसाधारण प्रतिनिधी गटातून विलास एरूडकर (३१४२),शिवराज खोराटे ((३१६८)राजाराम देवर्डेकर (३१३६)जालंधर पाटील(३१११),शुभम पाटील(३११२),सर्जेराव बुगडे(३१०१)श्रीकांत साळोखे(३०५७) महिला प्रतिनिधी आनंदी पाटील(३२१२),वैशाली पाटील(३१७३),इतर मागास प्रवर्ग लहु गुरव(३१६८),अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी मधुकर कांबळे (३२१०)विमुक्त,भटक्या जमाती प्रतिनिधी दत्तात्रय धनगर (३१७८) मते घेऊन उमेदवार विजयी झाले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून युसुफ शेख यांनी काम पाहिले.निवडणूक निकाल्यानंतर विजयी उमेदवारासह सर्व समर्थकांनी जल्लोष साजरा केला .विजयी उमेदवार यांनी सरवडेत समाजवादी नेते कै. शिवाजीराव खोराटे व कंथेवाडीत कै.आमदार शंकर धोंडी पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

संघाच्या स्थापनेपासून कारभार पारदर्शक व काटकसरीने चालू आहे. त्यामुळे आतापर्यंत काँग्रेस ,राष्ट्रवादी व अन्य पक्षानी कधीच हस्तक्षेप केला नाही. मात्र काही आमच्यातील विघ्न संतोषी मंडळीनी निवडणूक लादली मात्र सुज्ञ सभासदांनी व सर्वच पक्षाच्या नेतेमंडळी  राजर्षी शाहू आघाडीस प्रचंड मताधिक्याने विजयी केले आणि विरोधकांनी जागा दाखवली  - विठ्ठलराव खोराटे, आघाडीचे नेते