शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

विशाळगड प्रकरण: सामाजिक सलोखा बघडविण्याचा प्रयत्न आम्ही एकीतून हाणून पाडू, कोल्हापुरात सद्भावना यात्रेतून संदेश 

By भारत चव्हाण | Updated: July 18, 2024 17:54 IST

कोल्हापुरातील सर्वधर्मियांनी शिव-शाहू सद्भावना यात्रा काढून एकीचे दर्शन घडविले

कोल्हापूर : सर्व धर्मियांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि सामाजिक परिवर्तनाची लढाई लढणाऱ्या  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांची कास धरुन गुण्यागोविंदाने राहणाऱ्या करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडविण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी आम्ही विचलित होणार नाही, तर प्रतिगाम्यांचे हे प्रयत्न अधिक ताकदीने हाणून पाडू, असा संदेश देत कोल्हापुरातील सर्वधर्मियांनी आज, गुरुवारी शहरातून शिव-शाहू सद्भावना यात्रा काढून एकीचे दर्शन घडविले. या सद्भावना यात्रेत हजोरोंचा जमाव सहभागी झाला होता. विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याच्या मागणीवरुन पेटलेल्या आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केल्यामुळे उद्भवलेल्या हिंसाचारात विशिष्ठ समाजाला टार्गेट करुन समाजकंटकांनी जो धिंगाणा घातला, त्याचा तीव्र निषेध करण्याकरिता तसेच आम्ही तुमच्या असल्या भ्याड कृत्यांना घाबरणार नाही हे सांगण्यासाठी कोल्हापुरातील इंडिया आघाडीचे नेते तसेच समस्त पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी या सद्भावना यात्रेचे आयाेजन केले होते. अपेक्षेप्रमाणे या सद्भावना यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. नर्सरी बागेतील राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकापासून गुरुवारी दुपारी पाच वाजता सुरु झालेली ही सद्भावना यात्रा चिमासाहेब महाराज चौक, सीपीआर चौक, भाऊसिंगची रोड, महापालिकामार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचली. तेथे या सद्भावना यात्रेची सांगता झाली. ही यात्रा मुक होती, त्यामुळे कसल्याही प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या नाहीत. यात्रेत तिरंगा ध्वज, संविधानाची प्रत, राष्ट्रपुरुषांचे फलक पहायला मिळाले. सर्वधर्मिय समुदाय सद्भावना यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. या यात्रेचे नेतृत्व खासदार शाहू छत्रपती, विधान परिषदेतील कॉग्रेसचे गटनेते  आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे  छत्रपती यांच्यासह पुरोगामी कार्यकर्त्यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHinduहिंदूMuslimमुस्लीम