समाजकल्याण सहाय्यक आयुक्तपदी विशाल लोंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:21 IST2020-12-23T04:21:27+5:302020-12-23T04:21:27+5:30

कोल्हापूर : येथील समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून विशाल लोंढे यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. ...

Vishal Londhe as Assistant Commissioner of Social Welfare | समाजकल्याण सहाय्यक आयुक्तपदी विशाल लोंढे

समाजकल्याण सहाय्यक आयुक्तपदी विशाल लोंढे

कोल्हापूर : येथील समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून विशाल लोंढे यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने मंगळवारी हे आदेश काढण्यात आले. मात्र, येथील बाळासाहेब कामत यांना अजूनही पोस्टिंग देण्यात आलेले नाही.

विशाल लोंढे हे मूळचे पुण्याचे असून २०१४ ते २०१७ या कालावधीत ते कोल्हापूर येथील कार्यालयात समाजकल्याण विशेष अधिकारी म्हणून कार्यरत होते. येथून त्यांची बदली याच पदावर पुणे येथे झाली होती तर मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असलेले बाळासाहेब कामत यांची कोल्हापूरला सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. आता लोंढे यांची पदोन्नतीने या पदावर बदली करण्यात आली आहे.

२२१२२०२० कोल विशाल लोंढे

Web Title: Vishal Londhe as Assistant Commissioner of Social Welfare