शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Teachers Day -गुरुंकडूनच मिळाले व्हायोलिनचे धडे : व्हायोलिन वादक केदार गुळवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:40 IST

शिक्षक दिनानिमित्त कोल्हापुरातील एकमेव व्हायोलीन वादक केदार गुळवणी यांनी गुरुंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

ठळक मुद्देगुरुंकडूनच मिळाले व्हायोलिनचे धडे व्हायोलिन वादक केदार गुळवणी

इंदुमती गणेश कोल्हापूर : माझे आजोबा वसंतराव माईणकर हे व्हायोलिन, सतार, दिलरुबा, हार्मोनियम, तबला या वाद्यांचे वर्ग घ्यायचे. वडिलांना व्हायोलीन आवडायचे. मी वादनाची सुरुवात तबल्यापासून केली; पण महाविद्यालयात गेलो आणि व्हायोलिनशी तारा जुळल्या. माझ्या वादनाला शास्त्रीय संगीत आणि अभ्यासक्रमाचा पाया दिला तो गुरू सदाशिव नवांगुळे यांनी. त्यांच्यामुळे मी संगीत विशारद झालो..व्हायोलीन वादक म्हणून करिअर घडण्यात या तीनही गुरुंचे मला मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक दिनानिमित्त कोल्हापुरातील एकमेव व्हायोलीन वादक केदार गुळवणी यांनी गुरुंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.माझे शालेय शिक्षण स. म. लोहिया हायस्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण डी. डी. शिंदे सरकार महाविद्यालयात झाले. लहानपणापासून कानावर वाद्यांचे सूर पडत असल्याने त्यांच्याशी नाते जुळले होते; पण अकरावीत असताना व्हायोलीनची गोडी लागली. महाविद्यालयात पहिल्यांदा व्हायोलीन वाजविल्यानंतर जे प्रोत्साहन मिळाले, ते आजही लक्षात आहे. त्यानंतर रंगमंचीय सादरीकरणाला सुरुवात झाली.

महेश काळे, शौनक अभिषेकी, रवींद्र साठे, चंद्रशेखर गाडगीळ, अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर अशा अनेक दिग्गज गायकांना साथसंगत करण्याची संधी मिळाली. शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीत, नाट्यगीत, नाटक, पार्श्वसंगीत, चित्रपटांचे रेकॉर्डिंग, चित्रपटगीते या सगळ्या प्रकारांत मी व्हायोलीन वाजवू शकलो, ते गुरुंमुळे. आजही त्यांच्या आशीर्वादाने हा प्रवास आणि नवी पिढी घडविण्याचे कार्य सुरू आहे.आधी शास्त्रीय संगीत शिक..मला चित्रपटातील गाणी वाजवायला आवडायचे, तर आजोबा शास्त्रीय संगीताचे उपासक. एकदा मला व्हायोलीनवर गाणं वाजविताना त्यांनी ऐकले आणि रागावून दम भरला. आधी शास्त्रीय संगीत शिक. जोपर्यंत तुझा शास्त्रीय संगीताचा पाया पक्का होणार नाही, तोपर्यंत तू अन्य कोणत्याही प्रकारात वाद्य वाजवू शकणार नाहीस. तेव्हापासून मी त्यांच्यासमोर गाणी वाजवायचे बंद केले; पण शास्त्रीय संगीत यायला लागल्यानंतर मी एकदा राग बागेश्री वेस्टर्न स्टाईलमध्ये वाजवले, यावेळी मात्र कौतुकाची थाप दिली.म्हणून संगीत विशारद झालो...मला कुटुंबातूनच व्हायोलीन वादनाचे धडे मिळाले असले, तरी संगीत विशारद किंवा शास्त्रशुद्ध अ‍ॅकॅडमीक पद्धतीने याचे शिक्षण घेण्यास सांगितले, ते सदाशिव नवांगुळे सरांनी. ते माझ्या आजोबांचे शिष्य. गायन समाज देवल क्लबमध्ये शिकवायचे. इतका छान व्हायोलीन वाजवतोस, तर संगीत विशारद हो... हा कानमंत्र त्यांनी मला अमलात आणायलाच लावला. त्यांच्यामुळे मी संगीत विशारद पदवी संपादन केली व माझा संगीताचा पाया अधिक पक्का झाला. 

 

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनkolhapurकोल्हापूर