शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

विनता जोशी यांनी करवीरवासीयांना ठेवले खिळवून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 16:56 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अष्टपैलू कर्तृत्वाचा पोवाड्याच्या माध्यमातून वेध घेत त्यांच्याच नात विनता जोशी यांनी करवीरवासीयांना खिळवून ठेवले.

ठळक मुद्देविनता जोशी यांनी करवीरवासीयांना ठेवले खिळवून पोवाड्याच्या माध्यमातून सावरकरांचे तेजस्वी दर्शन

कोल्हापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अष्टपैलू कर्तृत्वाचा पोवाड्याच्या माध्यमातून वेध घेत त्यांच्याच नात विनता जोशी यांनी करवीरवासीयांना खिळवून ठेवले.येथील स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळाच्या वतीने सोमवारी राम गणेश गडकरी सभागृहामध्ये ‘नमन वीरतेला’ या शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर यांच्या विनता या नात आहेत.लहानपणीच सावरकरांनी घेतलेली स्वातंत्र्याची शपथ, शाळकरी वयातच असलेले क्रांतिकारी विचार, शिवछत्रपती शिष्यवृत्तीच्या माध्यमातून बॅरिस्टर पदवीसाठी लंडनला प्रयाण, तेथे राहूनही भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी मार्गांचा अवलंब, ब्रिटिशांकडून झालेली दोन जन्मठेपांची शिक्षा, मार्सेसिस बंदरातील उडी, साहित्यिक कर्तबगारी आणि अस्पृश्यांच्या उद्धारासाठीचे कार्य असा आढावा यावेळी जोशी यांनी पोवाड्याच्या माध्यमातून मांडला.मंडळाचे अध्यक्ष नितीन वाडीकर, एस. के. कुलकर्णी, शालन शेटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अपर्णा फडके यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विकास परांजपे, शाहीर आझाद नायकवडी, शाहीर राजू राऊत, प्रफुल्ल जोशी, उदय मालेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर