शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यसेवा मुख्य परीक्षेत कोल्हापूरचा विनायक पाटील राज्यात प्रथम, कोणताही क्लास न लावता मिळवले यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 11:44 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२२ चा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात मुदाळ ...

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२२ चा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात मुदाळ (ता. भुदरगड) येथील विनायक नंदकुमार पाटील याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली. भोसले हा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय गटातील (ईडब्ल्यूएस) आहे. आई-वडील दोघेही शेतकरी, कोणतेही क्लास न लावता कोल्हापुरातील खासगी अभ्यासिकेत अभ्यास करत विनायकने हे यश मिळवले.विनायकचे बारावीपर्यंतचे शिक्षण मुदाळमधील प. बा. पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्याने बी.एस्सी. केल्यानंतर त्याने कोल्हापुरात येत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सायबर चौकातील खासगी अभ्यासिकेत अभ्यास करून दुसऱ्याच प्रयत्नात त्याने हे घवघवीत यश मिळवले. दरम्यान, विनायक पाटील याने सहा महिन्यांपूर्वी विक्रीकर अधिकारी व उपशिक्षणाधिकारी परीक्षेतही यश मिळवले होते.आमच्या कष्टाची उतराई केली, वडिलांचा आनंद गगनात मावेनामुलाने महाराष्ट्रात प्रथम येत आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या कष्टाची उतराई केल्याची भावना विनायकचे वडील नंदकुमार पाटील यांनी व्यक्त केली. नंदकुमार पाटील यांना अवघी दोन एकर जमीन. पाटील दाम्पत्याची शेतीवरच गुजराण. मात्र, मुलाने मिळवलेले यश पाहून आई-वडिलांचा ऊर अभिमानाने भरून गेला.

या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलो यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो. यशात आई-वडिलांचे कष्ट मोठे आहेत. -विनायक पाटील,

गुणवत्ता यादी तात्पुरत्या स्वरूपाचीउमेदवारांकडून पसंतीक्रम मागविण्यात येत आहेत. त्यासाठी उमेदवारांना २२ ते २९ जानेवारीदरम्यान ऑनलाइन पसंतीक्रम भरून द्यायचे आहेत. उमेदवारांची त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार पदांवर निवड करण्यात येईल. ही गुणवत्ता यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर गुणवत्ताक्रमात बदल होऊ शकतो, असेही आयोगाने कळविले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMPSC examएमपीएससी परीक्षा