शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ई-पास विरोधात जोतिबा मंदिराबाहेर ठिय्या आंदोलन, गाव बंद ठेवून ग्रामस्थ सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 16:59 IST

जोपर्यंत ही अट शिथील केली जात नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सतीश पाटीलशिरोली : ई पास बंद करून जोतिबा मंदिराचे चारही दरवाजे खुले करावेत या मागणीसाठी जोतिबा वाडी रत्नागिरी येथे ग्रामपंचायत आणि समस्त गुरव समाजाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोतिबा मंदिर उत्तर प्रवेशद्वारात सुमारे एक हजारहून अधिक लोक आंदोलनात सहभागी झाले असून गाव बंद ठेवून हे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून श्री जोतिबा देवस्थान प्रसिद्ध आहे. तर सध्या जोतिबाचे खेटे सुरु आहेत. त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. दरम्यान येथील गुरव समाजाने मंगळवारी (दि.८) जिल्हाधिकाऱ्यांना ई पास बंद करून मंदिराचे दरवाजे खुले करावेत अन्यथा आज, शुक्रवारी आंदोलनाचा इशारा दिला होता.मात्र, प्रशासनाने या निवेदनाची दखल घेतली नाही. म्हणून ग्रामपंचायत आणि गुरव समाज व नागरिकांनी  जोतिबा मंदिराचे बंद दरवाजे खुले करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. शासनाने कोरोनाचे नियम शिथिल केले आहेत. मग ई- पास ही बंद करावा. भाविक आणि देवस्थान व पोलीस प्रशासन यांच्यात वारंवार वाद होत आहेत. म्हणूनच गुरव समाजाच्यावतीने या विरोधात गाव बंद ठेवून मंदिराच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. या आंदोलनात विष्णूपंत दादर्णे गोरख बुने, मानाचे दहा गावकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत...तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवणारजोतिबा डोंगरावर सुमारे पाचशेहून अधिक लहान मोठी विविध व्यावसायिका़ंची दुकाने आहेत. या सर्वांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. जोपर्यंत ही अट शिथील केली जात नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबाcorona virusकोरोना वायरस बातम्या