शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर हद्दवाढीला एक इंचही जागा देणार नाही, १९ गावांच्या ग्रामस्थांनी घेतली कठोर भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 16:05 IST

उचगाव : कोल्हापूर हद्दवाढीत गावांना न विचारता पालकमंत्री हद्दवाढ करतातच कशी? शहरांच्या विकासासाठी ४२ गावांसाठी नेमलेल्या प्राधिकरणाने कोणता विकास ...

उचगाव : कोल्हापूर हद्दवाढीत गावांना न विचारता पालकमंत्री हद्दवाढ करतातच कशी? शहरांच्या विकासासाठी ४२ गावांसाठी नेमलेल्या प्राधिकरणाने कोणता विकास केला, आमची गावे सक्षम आहेत. आम्हाला हद्दवाढीची गरज नाही. आमचं ठरलंय, एक इंचही जागा हद्दवाढीसाठी देणार नाही, अशी भूमिका १९ गावांच्या ग्रामस्थांनी घेतली आहे. हद्दवाढीला विरोध दर्शवीत या गावांनी येत्या १४ जुलै रोजी गाव बंदची हाक दिली आहे.उचगाव ग्रामपंचायत येथे झालेल्या बैठकीत १९ गावांच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, लोकप्रतिनिधी, महिलांनी हद्दवाढीविरोधात वज्रमूठ करून एल्गार पुकारला आहे. निर्णयप्रक्रियेत मुख्यमंत्र्यांनी १९ गावांच्या रहिवाशांना विचारात न घेता हद्दवाढीची भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही हद्दवाढ होऊ देणार नसल्याची भूमिका यावेळी ग्रामस्थांनी मांडली. हद्दवाढ केली तर नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम करू, असे जाहीर करून ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला.यावेळी कोल्हापूर महानगरपालिका सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी कृती समितीचे कार्याध्यक्ष आणि उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, कृती समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण, गडमुडशिंगीचे माजी सरपंच, उपसरपंच तानाजी पाटील यांच्यासह अन्य १९ गावांतील प्रमुख सरपंचांनी हद्दवाढीला विरोध दर्शविला आहे. यावेळी किरण आडसूळ यांनी स्वागत केले.यावेळी नारायण गाडगीळ (पाचगाव), अमर मोरे (मोरेवाडी), सुमन गुरव (कळंबा), प्रियांका पाटील (पाचगाव), ए. व्ही. कांबळे (मोरेवाडी), राहुल पाटील (कंदलगाव), संदीप पाटोळे (गांधीनगर), चंद्रकांत डावरे (गाेकुळ शिरगाव), शुभांगी आडसूळ (सरनोबतवाडी), अश्विनी शिरगावे (गडमुडशिंगी), भैया इंगवले (वळीवडे), करपे (शिरोली), शीतल मगदूम (शिये), संगीता पाटील (वडणगे), सुनंदा पाटील (आंबेवाडी), रवींद्र पोतदार (नागदेववाडी), मयूर जांभळे (बालिंगा), शुभांगी मिठारी (पीरवाडी), कावजी कदम, शिवसेना तालुकाप्रमुख राजू यादव, दीपक रेडेकर, अनिल शिंदे, राजेंद्र संकपाळ, तुषार पाटील यांच्यासह २०० ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर