शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनवाडाची एक गाव एक गणपतीची ७६ वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:27 IST

राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर आणि पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी तरुण मंडळांना केलेल्या प्रबोधनाने आणखी चार गावांमध्ये एक गाव ...

राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर आणि पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी तरुण मंडळांना केलेल्या प्रबोधनाने आणखी चार गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना रुजली.

अर्जुनवाडा येथे पहिलवान नामदेव चौगुले, सरपंच संपदा चौगुले, माजी सरपंच शरद पाटील, शहाजी बरगे व ग्रामस्थांनी भक्तिभावाने गावातील सार्वजनिक तालमीमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना केली.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू असलेल्या या परंपरेचा आदर्श आजही टिकून आहे. गावात अनेक गटातटाचे लोक असूनही ही मोहीम नवीन पिढीनेही जोपासली आहे. अनेक वेळा तालुका व जिल्ह्यातून या गावच्या उपक्रमांना विजेतेपद मिळाले आहे.

दूधगंगा नदीकाठावर वसलेले अर्जुनवाडा गाव ३५०० लोकवस्तीचे पहिलवानांचे गाव म्हणून राज्यात ओळख. महान भारतकेसरी व हिंदकेसरी दादु चौगले यांची जन्मभूमी असणाऱ्या गावातील काही जुन्याजाणत्या पहिलवान लोकांनी १९४४ मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात गावात एकच गणपती बसवण्याचा संकल्प केला. त्यावेळी पहिलवान भाऊसो यादव, गणपती तिकोडे, दत्तू वागरे, डॉ. दादासो यादव, दिनकर चौगले यांच्या पुढाकाराने श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. गावात एकच जुने तालीम मंडळ आहे. या तालमी शेजारील मंदिरात पहिलवान रूपातील श्री गणेशाची मूर्ती बसवली जाते. त्यावेळी तरुणांना एकत्र करून नामवंत मल्ल घडवण्याचे धडे देणे, गावात एकोपा वाढवणे, ब्रिटिश सरकारविरोधात आणि जुलमी राजवटीविरुद्ध हालचाली आदी खलबते येथे होऊ लागली. अनेक सामाजिक, प्रबोधनाचे उपक्रम राबवले जाऊ लागले. यातूनच पहिलवानांची जडणघडण झाली. तालुक्यातील अनेक गावांमध्ये सार्वजनिक मंडळे आहेत. प्रत्येक गावांत सर्व तरुण मंडळे गणेशमूर्ती बसवतात. यातून इर्षा वाढते, वाद होतात; पण अर्जुनवाडा या सर्च गोष्टींना अपवाद आहे. आज गावांत तालीम मंडळे, तरुण मंडळे, विविध संस्था, राजकीय गटतट आहेत, इर्षा आहे; मात्र या उपक्रमावेळी बाकी सगळे बाजूला ठेवून सर्व गटाचे लोक एकत्र बांधले जातात. ग्रामस्थांच्या एकीमुळे आजही परंपरा शाबूत आहे.