शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

कोल्हापूर विभागात विक्रमी ऊस गाळप

By admin | Updated: April 19, 2016 00:52 IST

सरासरी १२.४१ उतारा : दोन कोटी ७८ लाख २५ हजार २४० क्विंटल उत्पादन; गाळपात ‘जवाहर’, तर उताऱ्यात ‘गुरुदत्त’ आघाडीवर

प्रकाश पाटील -- कोपार्डे --कोल्हापूर विभागातील ३८ साखर कारखान्यांनी हंगाम यशस्वीपणे पूर्ण केला असून, या हंगामात दोन कोटी २४ लाख २७ हजार ४३० मे. टन विक्रमी उसाचे गाळप केले आहे. १२.४१ च्या सरासरी साखर उताऱ्यासह दोन कोटी ७८ लाख २५ हजार २४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ऊस गाळपात जवाहर-हुपरीने १५ लाख १६ हजार १०० मे. टन उसाचे गाळप करत विभागात आघाडी घेतली आहे, तर गुरुदत्त-टाकळीने सरासरी १३.५३ टक्के साखर उतारा मिळवत उताऱ्यात आघाडी घेतली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफ.आर.पी.च्या ८० टक्के पहिला हप्ता देण्यासाठी आघाडी घेतली आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही ती दिली आहे. चालू हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील २३ पैकी २१ साखर कारखान्यांनी आपले गाळप हंगाम पूर्ण करत एक कोटी ४४ लाख ७१ हजार ४५३ मे. टन उसाचे गाळप केले आहे. १२.६० च्या सरासरी साखर उताऱ्यासह एक कोटी ८२ लाख ४० हजार १५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. येथीलच जवाहर साखर कारखान्याने १५ लाख १६ हजार मे. टन उसाचे गाळप करून विभागात ऊस गाळपात आघाडी घेतली आहे, तर गुरुदत्त-टाकळीने १३.५३ चा सरासरी साखर उतारा मिळवत विभागातच नव्हे, तर पण राज्यात प्रथम क्रमांकाचा उतारा मिळविला आहे.सांगली जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी ६३ लाख ६२ हजार ६८५ मे. टन उसाचे गाळप केले आहे. १२.१९ च्या सरासरी साखर उताऱ्यासह ७७ लाख ५७ हजार ५४० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. हुतात्मा किसन अहिर, वाळवा कारखान्याने १३.०२ चा साखर उतारा मिळवून सांगली जिल्ह्यात आघाडी घेतली आहे, तर रा. बा. पाटील साखराळे युनिट-१ ने १० लाख ५२ हजार ६०० मे. टन उसाचे गाळप करून आघाडी घेतली आहे.मागील हंगाम २०१४/१५ मध्ये कोल्हापूर विभागात दोन कोटी ११ लाख ९७ हजार ६०५ मे. टन उसाचे गाळप झाले होते. १२.५३ च्या सरासरी साखर उताऱ्यासह दोन कोटी ६५ लाख ७० हजार ११६ क्विंटल साखर उत्पादन झाले होते. चालू हंगामात १२ लाख ३० हजार मे. टन उसाचे गाळप जादा झाले असून, १२ लाख ५५ हजार १२४ क्विंटल साखर उत्पादन जादा झाले आहे. मागील हंगामापेक्षा ०.१० ने उतारा मात्र घसरला आहे. कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा साखर कारखाने२३ (सहकारी १७, खासगी ६)१८ (सहकारी १३, खासगी ५) हंगाम घेतलेले २११७बंद कारखाने ०२०१उसाचे एकूण गाळप१ कोटी ४४ लाख६३ लाख ६२ हजार ७१ हजार ४५३ मे. टन ६८५ मे. टन साखरेचे एकूण उत्पादन १ कोटी ८२ लाख ७७ लाख ५७ हजार ४० हजार १५ क्विंटल५४० क्विंटलसरासरी साखर उतारा१२.६०१२.१९५० हजार टन ऊस शिल्लक कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर, दत्त-शिरोळ, शाहू-कागल, कुंभी-कासारी कुडित्रे, हमीदवाडा हे पाच साखर कारखाने सुरू आहेत, तर सांगली जिल्ह्यातील हुतात्मा किसन अहिर व सोनहिरा हे दोन कारखाने अद्याप सुरू आहेत. साधारण ५० हजार टन ऊस गाळप शिल्लक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, २० एप्रिलपर्यंत सर्व कारखान्यांचे गाळप हंगाम संपणार आहेत.